Mahayuti Election Strategy : महायुती जिंकणार 170 जागा; चंद्रकांतदादांनी सांगितलं आकड्यांचं गणित...

Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीमध्ये आमचे पीछेहाट झाली, असे चित्र निर्माण करण्यात आले. मात्र, त्या निवडणुकीमध्ये आम्ही 130 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहोत. त्यामुळे बहुमतासाठी दहा-बारा जागांचा प्रश्न आमच्यापुढे आहे.
Chandrakant patil
Chandrakant patilSarkarnama
Published on
Updated on

Pune, 17 September : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. दोन्हीकडून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ची रणनीती आखण्यात येत आहे. हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी महायुतीची रणनीती काय असणार, याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूतोवाच केले आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या चंद्रकांत पाटलांनी (chandrakant Patil) माध्यमांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या दहा दिवसांमध्ये मी रोज तीस घरगुती गणपती आणि तीस मंडळे, सोसायट्यांच्या गणपतीला भेट दिली आहे. साधारणतः 600 गणपतीचे दर्शन मी गेल्या दहा दिवसांत घेतले आहे. या दहा दिवसादरम्यान नागरिक मानसिकदृष्ट्या एकदम फ्री झाला असल्याचं जाणवलं.

सध्या राज्यात समृद्धी, सुख, समाधान आणि सुरक्षितता जाणवत असल्याने नागरिक मोकळेपणाने गणेशोत्सव साजरा करत असून पहाटे तीन-तीनपर्यंत महिला मुलं गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बाहेर फिरत आहेत. गणपती बाप्पाला यंदा महाराष्ट्राच सुख आणि पुन्हा महायुतीचं (Mahayuti) सरकार यावं, असं साकडं घातलं असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

महायुतीचं सरकार आणण्यासाठी बाप्पांचा आशीर्वाद आहे आणि आमचं कर्तृत्वदेखील आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आमचे पीछेहाट झाली, असे चित्र निर्माण करण्यात आले. मात्र, त्या निवडणुकीमध्ये आम्ही 130 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहोत. त्यामुळे बहुमतासाठी दहा-बारा जागांचा प्रश्न आमच्यापुढे आहे.

Chandrakant patil
Maharashtra Assembly Elections 2024 : काँग्रेससाठी दशकानंतर संधीची पहाट...

लोकसभा निवडणुकीच्या नंतरच्या काळामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, दहा लाख तरुणांना एक वर्ष अप्रेंटिसशिपची योजना सुरू करण्यात आली, मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.

तीन गॅस सिलिंडर मोफत असतील अथवा शेतकऱ्यांची विज बिल माफीचा निर्णय असेल मोठ्या प्रमाणात योजना लोकसभा निवडणुकीनंतर सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आले आहेत. या मुळे जी आघाडी 130 जागांवर लोकसभेला होती, ती विधानसभेला 170 जागा पर्यंत गेल्याचे पाहायला मिळेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Chandrakant patil
Shikhar Pahadia : सुशीलकुमार शिंदेंचा सेलिब्रिटी नातू अखेर सोलापूरच्या मैदानात; युवक काँग्रेसचा विधानसभेसाठी आग्रह

मुंबईमध्येही लोकसभेला महाविकास आघाडीपेक्षा दोन लाख मतं ही महायुतीला जास्त आहेत. दोन जागांवर आम्हाला थोड्याशा मतांनी पराभव स्वीकारावा लागला. एक जागा 19, 000 ने तर दुसरी जागा 29 हजार मतांनी गमवावी लागली. त्या जागा आल्या असत्या तर आम्ही चार आणि ते दोन असं समीकरण झालं असतं. मात्र पूर्ण कोकण बेल्ट महायुतीने सर केला आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com