Chandrakant Patil sarkarnama
पुणे

…म्हणून शेलारांनी मध्यावधी निवडणुकीचे भाकित केले!

विधानसभेच्या २८८ आणि लोकसभेच्या ४८ जागा लढवण्याची देखील आमची तयारी आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी एका कार्यक्रमात बोलताना 'राज्यात केव्हाही निवडणुका लागू शकतात' असे म्हटले होते. शेलार यांच्या वक्तव्यामुळे तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी याबाबत खुलासा केला. (Chandrakant Patil said on the statement of Ashish Shelar)

भाजप मध्यावधी निवडणुका झाल्या, तरी आपल्या ताकदीवर निवडणुका लढवेल. विधानसभेच्या २८८ आणि लोकसभेच्या ४८ जागा लढवण्याची देखील आमची तयारी आहे. शेलारांचे विश्लेषण या आधारावर आहे की इतके भांडूनही हे कुणी बाहेर पडत नाहीत. भांडणाचे दोनच परिणाम होतात असतात. एक तर आघाडीतून बाहेर पडणे किंवा दुसरे म्हणजे निवडणुकीला सामोरे जाणे. मात्र, हे बाहेरच पडत नाहीत, असे पाटील म्हणाले. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत पहिलाच ठराव झाला होता. की तीनच्या प्रभाग ठरावाला विरोध करायचा. पण दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डोळे वटारल्यावर विरोध लगेच मावळला. याचा अर्थ भांडल्यानंतरही सत्तेसाठी सरकारमधून बाहेर पडायला तयार नाहीत. त्यामुळेच भांडणाची परिणती मध्यावधीकडे जाणारी आहे, असे पाटील यांनी सांगितले.

भाजप-मनसे युतीवर बोलताना पाटील म्हणाले, भाजप-मनसे युतीचा निर्णय इतका सहजा सहजी होणार नाही. त्या युतीचे इतर राज्यात काय परिणाम होतील यावर चर्चा करावी लागेल. हा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेतला जाईल. राजकारणात वेध घ्यायचा असतो. केंद्राने आम्हाला एकटे लढण्यास सांगितले, असल्याचे पाटील यांनी सांगितले. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची आस निर्माण झाली होती. त्यामुळेचे त्यांनी हिंदुत्वाचे नुकसान केले, असा आरोप पाटील यांनी केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत काहीही म्हणो शिवसेनेने स्वार्थ पाहिला हे सर्वांना माहिती, असेही पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT