चंद्रकांतदादांनी चोळलं नाना पटोलेंच्या जखमेवर मीठ

महापालिका निवडणुकांसाठी आमची स्वबळावर महापालिका जिंकण्याची तयारी झाली आहे.
Chandrakant Patil
Chandrakant Patilsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ठाकरे सरकारने अगामी महापालिका निवडणुकीमध्ये तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. दरम्यान, हा निर्णय भाजपच्या पथ्यावर पडणारा, असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी एक प्रकारे पटोलेंच्या जखमेवर मीठच चोळले आहे. (Chandrakant Patil said ward formation is beneficial for us)

Chandrakant Patil
राष्ट्रवादी 'ती' संधी महिलेला देणार देणार का?

पाटील म्हणाले, मोठ्या आकाराचा प्रभाग आम्हाला फायद्याचा आहे. महापालिका निवडणुकांसाठी आमची स्वबळावर महापालिका जिंकण्याची तयारी झाली आहे. सर्व्हेसुद्धा तसेच येत आहेत. त्यामुळेच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात एकत्र येण्याची भाषा करत, असल्याचा टोला पाटील यांनी लगावला. भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्यात राज्यात मध्यावधी निवडणूक लागू शकतात, असे वक्तव्य केले होते. त्या विषयी बोलातना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, मध्यावधी निवडणुका लागल्या तरी आमची तयारी पूर्ण आहे. सरकार आम्ही तयार करू इतके बहुमत मिळू शकेल, असा दावा त्यांनी केला. या वेळी पाटील म्हणाले, आमची बुथनिहाय तयारी झालेली आहे. २८८ मतदारसंघ लढलो तर २ कोटींपर्यंत मते मिळवू शकतो, असा दावा पाटील यांनी केला.

Chandrakant Patil
...म्हणून बाळासाहेब थोरात एकत्र येण्याची भाषा करत आहेत!

भाजप-मनसे युतीवर बोलताना पाटील म्हणाले, भाजप-मनसे युतीचा निर्णय इतका सहजा सहजी होणार नाही. त्या युतीचे इतर राज्यात काय परिणाम होतील यावर चर्चा करावी लागेल. हा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेतला जाईल. राजकारणात वेध घ्यायचा असतो. केंद्राने आम्हाला एकटे लढण्यास सांगितले, असल्याचे पाटील यांनी सांगितले. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची आस निर्माण झाली होती. त्यामुळेचे त्यांनी हिंदुत्वाचे नुकसान केले, असा आरोप पाटील यांनी केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत काहीही म्हणो शिवसेनेने स्वार्थ पाहिला हे सर्वांना माहिती, असेही पाटील म्हणाले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विषयी बोलताना पाटील म्हणाले, जेवढे चान्स असतात, तेवढे चान्स अनिल देशमुख घेताहेत. त्यांना आता शरण यावे लागेल, पण तो माझा विषय नाही. परमवीर सिंग हे महाविकास आघाडीने केलेले आयुक्त आहेत. वर्षभर केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून महाविकास आघाडी सिंग यांना वाचवत, असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com