पुणे : गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध प्रश्नांवर तब्बल दोनशे पत्रे लिहिली. मात्र, एकाही पत्राला प्रतिसाद आला नाही, अशी माहिती स्वत: चंद्रकांत पाटील यांनी दिली. तुमचा आग्रहच आहे तर राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी आणखी एकदा प्रयत्न करतो. मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहितो. फोनदेखील करतो, असे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकार व भारतीय जनता पार्टीच्या यांच्यात आरोप-प्रत्योरोप होत आहेत. प्रत्येकवेळी विषय वेगवेगळे असतील, मात्र, एकमेकांवर टोकाची टीका केली जात आहे. वैयक्तिक आरोप केले जात आहेत. राजकारणाच्या पलिकडे जाऊन एकमेकांची ऊणीदुनी काढली जात आहेत. विशेषत: शिवसेना व भाजपातील हे वाक्युद्ध टोकाला गेले आहे. या संदर्भाने पत्रकारांनी विचालेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी ही माहिती दिली.
पाटील म्हणाले, ‘‘ राजकारणात मतभेद असतात. राजकारण करताना एकमेकांवर टीका होऊ शकते. मात्र, त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दांना काही मर्यादा असावी, अशी माझी आणि माझ्या पक्षाची सुरवातीपासूनची भूमिका आहे.महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपली जावी, अशी माझी सुरवातीपासूनची भूमिका आहे. गेल्या वर्षभरापासून मी याबाबत आग्रही आहे. तशी भूमिका मी यापूर्वीदेखील मांडली आहे.’’
एकमेकांवर टीका करताना काही मर्यादा पाळायला हव्यात. आपली राजकीय संस्कृती आपणच जपायला हवी, असा आमचा आग्रह आहे. या विषयात सर्व राजकीय पक्षांना एकत्रित आणून चर्चा करण्यासाठी राज्याच्या प्रमुखांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. गेल्या दोन वर्षात विविध प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी स्वत: दोनशे पत्रे लिहिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील २३१ पत्रे लिहिली. मात्र, एकाही पत्राला प्रतिसाद मिळाला नाही.तरीही तुमचा आग्रह असेल तर या विषयात मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहण्याची माझी तयारी आहे.त्यांना पत्र लिहून फोनसुद्धा करीन, असे पाटील यांनी सांगितले.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.