Chandrakant Patil | 
पुणे

शिवाजी महाराज, सावरकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा

शिवरायांच्या काळातील विहिरी आणि तटबंदी आजही शाबूत आहेत.

सरकारनामा ब्युरो

Chandrakant Patil | पुणे : छत्रपती शिवाजी महाराज पिढीला कळण्यासाठी नवीन अभ्यासक्रमात ३० टक्के अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा फुले यांच्या चरित्राचा समावेश केला जाईल, अशी घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. ते पुण्यात बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्य्राहून किल्ले राजगड येथे सुखरुप परतल्याच्या ३५६ व्या सुटका स्मृतीदिनानिमित्त पुण्यातील लाल महाल येथे पुणे महानगरपालिका आणि शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे यांच्या वतीने पालखीचे प्रस्थान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. शिवरायांच्या सुटकेचा स्मृती सोहळा शिवाजी राजगड स्मारक मंडळ हे गेल्या ४२ वर्षापासून करत आहे, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

एकूण अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ दोन पानी धडा हे अन्याय करण्यासारखे आहे. आजचे हे सोन्याचे दिवस कोणामुळे आले हे नव्या पिढीला कळण्यासाठी नवीन अभ्यासक्रमात ७० टक्के व्यवसाय-नोकरीसाठी, ३० टक्के महापुरुषांची चरित्रे, योग, कला आदींचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि कार्य कळण्याच्या दृष्टीने १०० मार्कांचा पेपर ठेवण्यात येईल.

इतकेच नव्हे तर, शिवरायांच्या काळातील विहिरी आणि तटबंदी आजही शाबूत आहेत. यावरुनच त्या काळातील बांधकाम किती चांगले होते ते कळते. आग्र्याला अटकेत असतान स्वराज्यावर आर्थिक संकट ओढावले होते. त्यावेळी त्यांनी तेथील सावकारांकडून अष्टप्रधानांकडे पैसे पुरविले आणि सुटकेनंतर ते त्यांनी व्याजासह परत केले होते, असंही यावेळी चंद्रकांत पाटील यानी सांगितलं. दरम्यान, कालही त्यांनी मुंबईत २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा हा धडा शालेय व महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकात घेण्याची घोषणा केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT