Eknath Shinde : राजकीय समीकरणं बदलणार ; कराडमध्ये यादवांच्या प्रवेशाने शिंदे गटाची पालिकेत एन्ट्री..

Eknath Shinde : यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादव ११ माजी नगरसवेक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

हेमंत पवार

Eknath Shinde : राज्यात सत्तातर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे काही दिवसापूर्वी त्यांच्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण पुण्यतिथीदिनी पहिल्यांदाच ते कऱ्हाड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या सभेत माजी उपनगराध्यक्ष,यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादव ११ माजी नगरसवेक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. (Eknath Shinde latest news)

यादव यांच्या प्रवेशामुळे कराडमध्ये शिंदे गटाला पहिल्यांदाच बळ मिळाले आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यादव यांच्या प्रवेशाला महत्व आहे. त्यामुळे शहरात बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद वाढली असल्याची चर्चा आहे. महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलून शिंदे गटाची पालिकेतील एन्ट्री सोपी होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Eknath Shinde
Sanjay Raut : भाजपचे टगे किती दिवस तोंड शिवून बसणार ; राऊत संतापले

यशवंत विकास अघाडीचे यादव यांच्यासह त्यांच्या ११ माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी "आमच्या गटाकडे येणाऱ्यांचा ओघ कायम आहे. ५० आमदार, १३ खासदार, १४ राज्याचे प्रमुख माझ्याबरोबर असून दररोज शेकडो पदाधिकारी वर्षा बंगल्यावर रोज येतात. अनेक जण आमच्या गटात प्रवेश करताहेत," असे सांगून आहे.

कऱ्हाडच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी १०० खोकीही देण्यास मागे-पुढे पाहिले नाही. मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यावर येण्याअगोदरच येथील शंभूतीर्थावर उभारण्यात येणाऱ्या स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून खास बाब म्हणून आठ कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.

Eknath Shinde
Jayant Patil : जयंत पाटलांना अश्रू अनावर, शरद पवारांसह उपस्थितही भावुक

मुख्यमंत्र्याचा हा पहिलाच कऱ्हाड दौरा होता. त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आठवडाभरापासून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कऱ्हाडमध्ये फिल्‍डिंग लावली होती. त्यांनी पुढाकार घेऊन काही कार्यक्रम आयोजित केले. पालिका निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेतील राजेंद्र यादव गटाला भाजपची साथ मिळाल्यास नगरसेवकांच्‍या बेरजेत आश्चर्यकारक बदल होऊ शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com