Chandrarao Taware, Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar NCP Split : जुन्या मित्राचेच शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, "राष्ट्रवादी फुटीचा ठरवून केलेले..."

NCP Crisis And Sharad Pawar Old Friend : शरद पवार आणि अजित पवार यांना चांगलेच ओळखत असल्याचा तावरेंचा दावा

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Vs Chandrarao Taware : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवारांसह पक्षातील ज्येष्ठ नेते राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांचा सामना करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला. त्यासाठी पवारांनी राज्यव्यापी दौऱ्याचेही आयोजन केले आहे. असे असताना बारामती येथील जुन्या मित्राने शरद पवार यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राज्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. (Latest Political News)

सहकारमहर्षी, बारामतीतील भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे हे शरद पवार याचे जुने सहकारी आहेत. तावरे यांनी पवार यांच्यासह ४० वर्षे काम केले. पवार यांच्यासाठी निवडणूक प्रमुख म्हणूनही तावरे यांनी काम पाहिले आहे. जवळचे संबंध असल्याने पवार व कुटुंबीयांचे स्वाभाव माहिती आहेत. त्यानुसार पवार कुटुंबियांमध्ये कधीही फूट पडणार नाही. आता जे सुरू आहे ते सर्व ठरवून केलेले नाटक असल्याचा गंभीर आरोप चंद्रराव तावरे यांनी केला आहे. ते खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

चंद्रराव तावरे म्हणाले, "गेल्या ४० वर्षे पवारांसोबत राजकारण केले आहे. त्यांच्यासाठी विविध पातळीवर काम केले. पवार कुटुंबीयांचा सर्व स्वभाव माहिती आहे. पवार कुटुंबात कधीही फूट पडू शकत नाही. ते सर्वजण एक आहेत. न्यायालयीन कारवाईपासून कुटुंबास वाचवण्यासाठी व भाजपच्या वरच्या लोकांना दाखवण्यासाठी पवारांचे राजकीय नाटक सुरू आहे. हे नाटक २०२४ पर्यंत सुरू ठेवायचे आणि त्यानंतर पूर्ववत व्हायचे असा पवारांचा डाव आहे."

शरद पवार आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी यापेक्षाही मोठे पावले उचलतील असा आरोपही तावरे यांनी केला आहे. चंद्रराव तावरे म्हणाले, "न्यायालयीन कारवाई झाली तर संपूर्ण पवार कुटुंबाची वाताहात होणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी यापेक्षाही मोठे पावले पवार उचलतील." या आरोपाचे समर्थनासाठी तावरे यांनी अडीच दिवसाच्या सरकारचे उदाहण दिले.

तावरे म्हणाले, "अडीच वर्षांचे जे सरकार झाले त्याची काय गरज होती. त्यावेळी अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. मग ते सरकार काय पाडायची गरज होती? याचे कारणही पवारांनी दिले आहे. त्यांना राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवायची होती. ती राजवट उठवली नसती तर पुढील निवडणूक त्यांना लढवता आली नसती."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT