Ajit Pawar In Shinde Fadnavis Government : आधी अपयशी मुख्यमंत्री, आता लोकप्रिय...! ; अजितदादांना दहा दिवसांतच झाला साक्षात्कार..?

Shasan Aaplya Dari Programme : '' बाकी कुणी काहीही म्हणू द्या आम्ही....''
eknath shinde,  ajit pawar
eknath shinde, ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

Gadchiroli : शिंदे फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीलाच अजित पवार यांनी एकनाथ शिंदे हे आत्तापर्यंतचे सर्वात अपयशी मुख्यमंत्री असल्याची घणाघाती टीका केली होती. मात्र, या टीकेला आठ दिवस उलटत नाहीतोच राष्ट्रवादीत बंड करुन आठ वरिष्ठ नेत्यांसह अजित पवार हे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाले. एवढंच नाहीतर थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र, आता अजित पवारांनीच सत्तेत सहभागी होण्याचं कारण सांगतानाच शिंदेंचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला आहे.

गडचिरोलीमधील 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) शनिवारी (दि.८) उपस्थित होते. या शासकीय कार्यक्रमाला तिघेही नागपूरवरून गडचिरोलीला हेलिकॉप्टरनं एकत्रित हजेरी लावली.या कार्यक्रमात अजित पवारांनी आधी अपयशी मुख्यमंत्री म्हटलेल्या शिंदेंचा उल्लेख लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला. तसेच यावेळी त्यांनी अजित पवार यांनी भाजपा शिवसेना महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाल्याचं कारण सांगितलं. यावेळी त्यांनी बाकी कुणी काहीही म्हणू द्या आम्ही जनतेच्या विकासासाठी सत्तेत सहभागी झालो आहोत असं स्पष्ट केलं.

eknath shinde,  ajit pawar
Ajit Pawar News : अजितदादा आग्रही असलेल्या खात्याबाबत लवकरच निर्णय होणार ?

अजित पवार काय म्हणाले...?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत भाष्य केलं. यावेळी पवार म्हणाले, माझे भाजपचे कार्यकर्ते, माझे शिवसेने(Shivsena) चे कार्यकर्ते आणि माझे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, या सर्वांनी एकत्रितरित्या काम करावं. सरकार जनतेसाठी असतं, त्यांच्या अडचणी कमी व्हाव्यात हेच महायुतीचं उद्दिष्ट आहे. हा कानमंत्र अजित पवार यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

eknath shinde,  ajit pawar
Thackeray group warning to Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांना ठाकरे गटाचा इशारा ; 'सांभाळून रहा'...

...म्हणून आम्ही सरकारमध्ये गेलो!

अजित पवार म्हणाले, भाजप, शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झालं आहे. फक्त विकासासाठी आम्ही सरकारमध्ये गेलो आहोत. कोणी काहीही बोलत असेल तरी आम्ही विकासासाठी आलो आहोत.याचवेळी सरकारमधील महत्वाचे, वरिष्ठ नेते गडचिरोलीची जबाबदारी घेत आहे. आधी आर. आर. पाटील, नंतर एकनाथ शिंदे आणि आता फडणवीस पालकमंत्री आहेत. उद्दिष्ट एवढेच आहे की, येथील विकास होऊन नक्षलवाद नाहीसा झाला पाहिजे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com