Hemant Rasane News
Hemant Rasane News Sarkarnama
पुणे

Kasba by-election : चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंचे टेन्शन वाढले!

सरकारनामा ब्यूरो

Kasba by-election News : कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपने हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, निवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे (BJP) अजूनही प्रयत्न सुरु आहेत. पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे रासने यांचे टेन्शन वाढले असल्याची चर्चा आहे.

बावनकुळे यांनी शैलेश टिळक यांची भेट घेतली. या भेटीनंतर बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले, उद्या ३ वाजेपर्यंत महाविकास आघाडीने जर ही निवडणूक बिनविरोध केली, तर आम्ही उद्या हेमंत रासने यांची उमेदवारी मागे घेऊ. नाना पटोले यांना विनंती आहे की उद्या निवडणूक लादू नये, विधानसभा निवडणुकीसाठी एकच वर्ष बाकी आहे. त्यामुळे लोकांवर निवडणूक लादू नये. बावनकुळे यांनी असे म्हटल्यामुळे रासने यांच्या उमेदवारीवर अजूनही टांगती तलवार आहे.

जर महाविकास आघाडीने निवडणुक बिनविरोधसाठी होकार दिला तर रासने यांना उमेदवारी मागे घ्यावी लागले. मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे येथे भाजपला सहानुभूती मिळेल, अशी आशा आहे. त्यातच रासने यांनी मोठी तयारी केली आहे. मात्र, जर त्यांना उमेदवारी मागे घ्यावी लागली तर तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यावेळी बावनकुळे म्हणाले, मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते, सगळे इतर नेते म्हणाले म्हणून आम्ही अंधेरीची पोटनिवणूक बिनविरोध केली. आमचे कागदपत्र तयार आहेत, फॉर्म तयार आहे. टिळक परिवाराला आम्ही उमेदवारी द्यायला तयार आहेत. मात्र, आघाडी कडून तसे येऊ द्या.

चिंचवडमध्ये आम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे. पण अजूनही संवाद नाही. कोणी ही असो टिळक, घाटे, रासने किंवा बिडकर यांच्यापैकी कुणीही १०० टक्के निवडून येतील. मात्र, एका जागेवर एकालाच निवडणूक लढवता येते, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

कोणाला ही डावळण्याचा प्रयत्न नाही. अनेक ठिकाणी ज्यांच्या घरी दिवंगत नेते गेले, आहेत त्यांना तिकीट दिले नाही. १००० टक्के कोणाची ही नाराजी नाही. काही लोकं जाणीवपूर्वक बॅनरबाजी करत आहेत. टिळक कुटुंबीय कधीच नाराज होऊ शकत नाहीत. मुक्तता ताई आमच्या नेत्या होत्या. लोक कल्लोळ करत आहेत की टिळक कुटुंबीय नाराज आहेत, पण कोणीही नाराज नाही, असा आरोपही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT