Kasba By-Election : कसबा मतदारसंघासाठी भाजपने टिळक कुटुंबाला उमेदवारी डावलत माजी नगरसेवक हेमंत रासने यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. उमेदवारीत ब्राह्मण समाजाला डावलल्यामुळे समाज भाजपवर नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. ब्राह्मण समाजाने हा अन्याय का सहन करायचा? अशा आशयाचे फलक कसबा पेठमध्ये लागलेले दिसून आले. यामुळे भाजपवर ब्राह्मण समाजाचा रोष वाढताना दिसून येत आहे, याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.
कसबा पेठेतले स्थानिक मतदार पवन कलमदाने यांनी 'सरकारनामा'शी बोलताना आक्रमक भूमिका मांडली. वेळ आल्यावर ब्राह्मण समाज भाजपला दाखवून देईल. ते पुढे म्हणाले, "टिळक कुटुंबाला उमेदवारी डावलून भाजपने ब्राह्मण समाजवर अन्याय केला आहे. टिळक कुटुंबाने मतदारसंघासाठी विविध विकासकामे करूनही त्यांना डावलले जाते. कसबा पेठेतील स्थानिक भाजपच्या नेत्यांनी ब्नाह्मण समाजाचा उमेदवार द्यावा, यासाठी मागणी रेटायला पाहिजे. असा अन्याय जर भाजपवर होत असेल, ब्राह्मण समाज वेळ आल्यावर भाजपला दाखवून देवू, असे मत पवन कलमदाने या स्थानिक मतदाराने व्यक्त केले आहे."
मोहन साने या मतदाराने म्हंटलं आहे की, "ब्राह्मण समाजाला कोणीही उचलतो आपटतो, ब्नाह्मण समाजाला राजकीय मूल्य राहिले नाही. भाजपसुद्धा ब्राह्मण समाजाला बहिष्कृत करतो आहे. ठिक आहे सर्व जाती पातीतील लोकं सोबत आली पाहिजेत. पण ज्या घरात निधन झालं, तेथे उमेदवारी देणं आवश्यक आहे. धंगेकर ही चांगले उमेदवार आहे. मतदानावर याचं निश्चित परिणाम होईल. कोथरूडमध्ये ही मेधा कुलकर्णी यांची हक्काची जागा डावलून, तेथे चंद्रकांत पाटलांना आणलं. रासने यांना वैयक्तिक विरोध नाही,पण धंगेकर हा डायनामिक व्यक्तिमत्व आहे, त्यांचं काम चांगलं आहे. आता पाहू निकालात काय दिसून येतं.
कसबा पेठेतील शशिकांत जाखडे म्हणतात, "ब्राह्मण समाज म्हणून नाही, पण मुक्ताताई टिळक यांनी मतदारसंघासाठी खूप काही कामं केली त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी मिळायला हवी होती. परंतु भाजपने कोणत्या राजकीय गणितातून टिळक कुटुंबाला डावललं कळत नाही. मुक्ताताई या आजारपणात ही पक्षनिष्ठा ठेवत पुण्यातून मुंबईत मतदानासाठी दाखल झाल्या. याची जाण भाजपने ठेवायला हवी होती. पण आता याचा फटका भाजपला मतदानातून दिसून येईल."
यामुळे आता एकूणच कसबा पेठेत लक्षणीय प्रमाणात असणाऱ्या ब्राह्मण समाजाचा रोष भाजपला सामना करावा लागणारे का? भाजप याला कसा सामोरा जाईल. मतदानाच्या दिवसापर्यंत ब्राह्मण समाजाची काय भूमिका होईल. निकालात याचा काय परिणाम होईल का? पाहणे महत्त्वाचे महत्त्वाचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.