BJP Sarkarnama
पुणे

BJP Mission 45 : मिशन ४५ सक्सेस करणार; पण कसे बावनकुळेंनी जागावाटपाची रणनीतीच सांगितली

Chandrashekhar Bawankule in Pimpri Chinchwad : अश्विनी जगतापांच्या विधानांचा विपर्यास

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : लोकसभा निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. महाराष्ट्रातून लोकसभेच्या ४५ जागा आणण्याचा संकल्प महायुतीने केला आहे. सध्या ज्यांच्या ज्या जागा आहेत, ते त्याच लढवणार आहेत.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह ११ पक्ष एकत्रिपणे येऊन लोकसभेच्या जागांबाबत चर्चा केली जाणार आहे. आम्ही एकजुटीने निवडणूक लढवणार आहोत, जिंकणार आहोत, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला. (Latest Political News)

लोकसभा निवडणुका सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी लोकसभा मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपच्या वतीने मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त आयोजित केलेल्या काळेवाडीतील घर चलो अभियान कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, "भाजपच्या वतीने लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाने केलेल्या कामांची माहिती दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणून जनतेसमोर जायचे आहे.

लोकसभेची कोणती जागा कोण लढवेल. याची चर्चा आताच करणे योग्य नाही. महायुतीतील घटक पक्षांच्या ज्या-ज्या जागा असतील तेच लढवून पंतप्रधान मोदींचे हात मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आता कोण कोणती जागा लढवणार यापेक्षा ४५ खासदार निवडून आणायचे, हाच महायुतीचा संकल्प आहे."

जगतापांना डावलण्याचा प्रश्नच येत नाही

आमदार अश्विनी जगताप यांनी प्राेटोकॉल पाळला जात नाही, याबाबत नाराजी व्यक्त केली होती. जाहीर पत्रकार परिषदेतच हा प्रकार घडल्याने आमदार जगतापांना डावलले जात असल्याची चर्चा होती. त्यावर बावनकुळेंनी असे काही घडलेच नसल्याचे सांगितले.

"मी या प्रकाराची माहिती घेतली. आमदारांच्या विधानाचा विपर्यास केला आहे. त्या लोकप्रतिनिधी आहेत. पक्षात संघटना आणि लोकप्रतिनिधी या दोघांचेही महत्त्व आहे. त्यामुळे कोणीही लोकप्रतिनिधींना डावलणार नाही."

बावनकुळेंनी बारामतीत महायुतीच विजयी होणार असल्याचा दावा केला. ते म्हणाले, बारामती लोकसभेची जागा कोणास, कोण उमेदवार असेल? हे आताच सांगता येणार नाही. पण बारामतीतून महायुतीच विजयी होणार आहे आणि महायुतीचाच उमेदवार असेल." (Maharashtra Political News)

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे शक्तिप्रदर्शन!

घर चलो अभियान आणि युवा वॉरियर्स संवादासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. भाजपच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहर परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

शहर परिसरातील विविध रस्त्यांवर ठिकठिकाणी फ्लेक्स, बॅनर्स लागले होते. उपक्रम राबविण्यात येत होता, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली. या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT