Mumbai News: आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट देखील अॅक्शन मोडवर आला असून पक्षातील पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्याचा धडाका अजितदादांनी लावला आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून मुंबई विभागासाठी दोन मोठ्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. नरेंद्र राणे आणि शिवाजी नलावडे यांच्यावर मुंबई कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजित पवार गटाचे मुंबई विभागाचे अध्यक्ष समीर भुजबळ यांची निवड काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती.
आता नरेंद्र राणे आणि शिवाजी नलावडे यांच्यावर मुंबई कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र राणे यांच्यावर दक्षिण मध्य, दक्षिण मुंबई आणि उत्तर मध्य विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर शिवाजी नलावडे यांच्याकडे उत्तर मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई विभागासाठी दोन कार्याध्यक्ष नेमल्यामुळे पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी फायदा होणार असल्याचे बोलले जात असून दोन्ही कार्याध्यक्षांना प्रत्येकी तीन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अजितदादांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.