Pune News : पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेत असलेल्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्या नंतर पुण्याचं राजकारण ढवळून निघाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे या प्रवेशांना भाजप मधून अंतर्गत विरोध होताना पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे प्रवेश झालेल्या या पाच माजी नगरसेवकांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी टार्गेट दिलं आहे. यानंतर लगेचच हे नेतेही कामाला लागले आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमी वर भाजपामध्ये (BJP) मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होताना पाहायला मिळत आहे. मंगळवारी ठाकरे सेनेतील 5 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश पार पडला. यामध्ये माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे तसेच प्राची अल्हाट हे भाजपवासी झाले आहेत.
मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात हे प्रवेश करण्यात आले मंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हे प्रवेश संपन्न झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन 12 तारखेला होणार असून नवीन प्रवेश झालेल्या पाचही माजी नगरसेवकांनी घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधून या अधिवेशनाच्या तारखेपर्यंत किमान 1000 प्राथमिक सदस्य नोंदणी करावी असं टार्गेट दिला आहे.
यांनी दिलेल्या टार्गेट नंतर आता भाजपवासी झालेले नगरसेवक कामाला लागल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी आज सोशल मीडियावर ती पोस्ट करत मी भारतीय जनता पार्टीचा सदस्य झाले असून तुम्हीही सदस्य व्हा असं आवाहन केले आहे. विशाल धनवडे या पोस्टमध्ये म्हणाले, मी भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्य झालो आहे. आपणही भारत मातेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि आपल्या परिवाराच्या व राष्ट्राच्या उद्धारासाठी आजच भारतीय जनता पक्षाचे प्राथमिक सदस्य व्हावे, आणि इतरांना हि सभासद नोंदणी करायला सांगावे.
दरम्यान स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा या प्रवेशाला विरोध असताना देखील हे प्रवेश झाल्याने आता भाजप मधील अंतर्गत खदखद बाहेर येऊ लागली आहे. या पक्षप्रवेशानंतर कसबा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षप्रवेशाबाबत नाराजी व्यक्त करणारे पोस्टर भाजप पदाधिकाऱ्यांनी लावल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच पुण्याच्या नवीन कारभारी झालेल्या भाजपच्या नेत्यांवर हे पदाधिकारी उघड उघड तोंड सुख घेताना पाहायला मिळत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.