Pune News : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या मतदारसंघात पोटनिवडणुकीची चर्चा जोरात आहे. बापटांच्या निधनानंतर काही दिवसातच चर्चांना उधाण आल्याने अनेक नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.आता याबाबत भाजप महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (ChandraShekhar Bawankule) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
“पुण्यातील भाजपचे दिवंगत खासदार, गिरीश बापट यांचे कुटुंबातील सदस्य दुख:तून अजून सावरलेले नाही. यामुळे पुणे लोकसभेची निवडणुकीसंदर्भात कोणत्याही अफवा पसरवू नका. यावर मी ही कसली चर्चा करणार नाही. कोणतीही चर्चा होणार नाही," असे बावनकुळे म्हणाले.
पुण्याच्या मावळ तालुक्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शेटेवाडीतील पुनर्वसन करण्यासाठी जमीनीचे लाभार्थींना वितरण करण्यात आले. यावेळी खासदार बापटांच्या निधनामुळे रिक्त मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपाचा कोणाला उमेदवारी देईल? अशी चर्चा शहरात होत आहे. या चर्चांना बावनकुळे यांनी आता एकप्रकारे भाजपकडून पुर्णविराम दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.