Ajit Pawar News : 'शरद पवार आमचे सर्वोच्च नेते, त्यांची भूमिका हीच..' ; अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar On Adani Case : पवारांची भूमिका हेच पक्षाचं धोरण..
Ajit Pawar On Adani Case
Ajit Pawar On Adani CaseSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Statement On Adani : अमेरिकेतील हिंडेनबर्ग या फर्म कंपनीने एक रिपोर्ट जाहीर केले होते. या रिपोर्टमध्ये हिंडेनबर्ग कंपनीने भारतातील मोठे उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लगावण्यात आले होते. याविषयावरून संसदेतही घमासान घडून आला. अदाणींच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. अदाणी यांना लक्ष्य केले जात आहे, असे पवार म्हणाले होते.

Ajit Pawar On Adani Case
Ambadas Danve On Ayodhya News : बाळासाहेबांच्या देव्हाऱ्यातून चोरलेला बाण रामाचा होवूच शकत नाही...

काँग्रेस पक्ष अदानी प्रकरणावरून काँग्रेसने मोर्चा उघडून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असताना, शरद पवारांच्या या प्रकरणी वेगळी भूमिका घेतल्याने, यावर चर्चा होत आहे. दरम्यान आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

"शरद पवार हे आमचे शीर्षस्थ नेते आहेत. त्यांनी जी भूमिका मांडली आहे, आता त्यानंतर आम्ही यावर भाष्य करू शकत नाही. त्यांची भूमिका हीच आमच्या पक्षाची भूमिका असते, "असं वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होते.

Ajit Pawar On Adani Case
ED Arrests Anil Jaisinghani : अनिल जयसिंघानीला अहमदाबादमध्ये ED कडून अटक

काय म्हणाले होते शरद पवार?

हिंडेनबर्ग प्रकरणी विरोधीपक्षांनी काँग्रेसने केलेली जेपीसीची मागणी ही अनावश्यक असल्याचे शरद पवार यांनी म्हंटले होते. जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीत सत्ताधारी पक्षाचेच नेहमी बहुमत राहिले आहे. त्यामुळे जे काही सत्य आहे, ते बाहेर येणार नाही, असे मत पवारांनी व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाडूनच ते सत्य बाहेर येण्याची शक्यता अधिक आहे, असेही पवार म्हणाले आहेत. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी, असे मत व्यक्त केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com