Pune : 'चांद्रयान'च्या यशाबाबत बोलताना चुकून माझ्याकडून 'चंद्रकांत' हा शब्द उच्चारला गेला,असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. कामाच्या व्यापामुळे चुकून 'चंद्रकांत' म्हटलं गेले, असे स्पष्टीकरण अजितदादांनी दिले.
अजितदादांनी भाजपचे नेते, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं नाव घेतलं असावं, अशी चर्चा होती. याबाबत अजितदादांनी खुलासा केला आहे. अजितदादांनी 'चांद्रयान'ऐवजी "चंद्रकात'असे म्हटल्यानंतर अनेक मिम्स समाजमाध्यमावर व्हायरल झाल्या होत्या.
बुधवारी (ता.२३) सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी भारताने चंद्रावर पाठवलेल्या चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. त्यानंतर अजितदादांनी हे विधान केलं होते
पिंपरी-चिंचवडच्या पाणी प्रश्नाबाबत अजित पवार म्हणाले, "पुढील काही वर्षात पिंपरी चिंचवड शहरात पाणी टंचाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टाटा धरणाचे पाणी आपल्याला मिळावे, त्यासाठी प्रशासन स्तरावर कारवाई सुरू आहे,"
"लोणावळा परिसरात पडणारा पाऊस समुद्राकडे वाहून जातो, त्या पाण्याचे योग्य नियोजन करावं लागणार आहे. पाणीप्रश्नाबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत," असे ते म्हणाले.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.