Sharad Pawar Statement : अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वादळ उठले आहे. यावरून वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.
"अजित पवार आमचेच नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही," असे विधान शरद पवार यांनी केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, "शरद पवारांचे विधान मी ऐकले नाही. सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य मी ऐकले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्तेत आहोत. अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आज आपल्याशी बोलत आहे. राष्ट्रवादी पक्षाचा अधिकृत अध्यक्ष म्हणून मी बोलतो आहे. एनडीएच्या बैठकीत हजेरी लावून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्या दृष्टीने संभ्रम नाही,"
अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ म्हणाले,"शरद पवारांच्या वक्तव्याचे आम्ही स्वागत करतो. आमचीही तीच भूमिका आहे. अजित पवार जसे नेते आहेत, तसे भुजबळ, मुंडेसुद्धा त्यांचेच (शरद पवार) कार्यकर्ते आहोत. आम्हीही तेच म्हणतोय. म्हणूनच आम्ही त्यांना भेटलो. पक्षात फूट नाही. फक्त एक गट सरकारमध्ये सहभागी झाला. आता तुम्हीही समर्थन द्यावे एवढंच आमचं म्हणणं आहे,"
अजित पवार गटानेही या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. "पक्ष फुटला नाही म्हणतात तर मग आपल्याच कार्यकर्त्यांना बॅनरवर फोटो लावू नका, असे का म्हणतात," असा प्रश्न उपस्थित केला आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.