Pimpri Chinchwad  Sarkarnama
पुणे

Pimpri Chinchwad News : भाजपच्या आरोग्य शिबिरात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या डॉक्टर,कर्मचाऱ्यांकडून तपासणी

Devendra Fadnavis News : भाजपच्या या शिबिरात पालिकेच्या वैद्यकीय पथकाने सुट्टीच्या दिवशी कशी तपासणी केली याची लगेच चर्चा रंगली.

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chinchwad : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस (ता.२२) काल भाजपने सेवा दिवस म्हणून साजरा केला. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड भाजपने शहरातील वाकड भागातील दोन झोपडपट्यांत आरोग्य शिबिरे घेतली.मात्र,त्यात रुग्णांची तपासणी ही पिंपरी-चिंचवड महापालिकेचे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केल्याने त्याची मोठी चर्चा झाली.

काळाखडक आणि अण्णाभाऊ साठेनगर झोपडपट्यांत भाजप(BJP)चे स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या शिबिरांत महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयाचे मुख्य आरोग्य अधिकारी (सीएमओ) डॉ राजेंद्र फिरके व पथकाने अंदाजे चारशे रुग्णांची तपासणी केली. मात्र,भाजपच्या या शिबिरात पालिकेच्या वैद्यकीय पथकाने पालिकेच्या सुट्टीच्या दिवशी कशी तपासणी केली याची लगेच चर्चा रंगली. त्यावर पिंपरी महापालिकेच्या वैद्यकीय पथकाला सारवासारव करावी लागली.

आऊट रिच मोहिमेत ही शिबिरे घेण्यात आल्याचे पालिकेच्या वैद्यकीय विभागातून `सरकारनामा`ला सांगण्यात आले.मात्र, देवेंद्र फडणवीसां(Devendra Fadnavis)च्या वाढदिवशीच ती कशी घेतली,अगोदर वा नंतर का नाही,अशी विचारणा केली असता त्याचे समाधानकारक उत्तर त्यांना देता आले नाही.पालिकेने हे शिबिर आयोजित केले होते,तर मग तेथे भाजप नेते व पदाधिकारी काय करीत होते, हे ही पालिकेच्या जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्याला सांगता आले नाही.

फडणवीसांच्या ५३ व्य़ा वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराच्या जोडीने पिंपरी-चिंचवड भाजपने शहरात ५३ हजार झाडे लावण्याचे महाअभियानही काल हाती घेतले. पण, शहरात एवढे खड्डे कुठे,कधी आणि कोण घेणार,तेथे कोणती झाडे लावणार याविषयी वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तर शहर भाजपकडून मिळाले नाही.

तसेच काल विशालनगर,पिंपळे निलख येथे मोठा गाजावजा करून सुरु करण्यात आलेल्या या अभियानात किती झाडे लावली,हे ही त्यांना सांगता आले नाही. शहर आणि परिसरात पर्यावरण रक्षणाच्या संकल्पनेतून ५३ हजार ऑक्सिजनपूरक वृक्षांची लागवड करण्याचे हे महाअभियान हाती घेण्यात आल्याचे नवनियुक्त भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप(Shankar Jagtap) यांनी सांगितले.

शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा संकल्प केला असून त्यात अशा पर्यावरणपुरक उपक्रमांवर भर राहणार आहे,असेही ते म्हणाले.दुसरीकडे भाजपच्याच एका शहर पदाधिकाऱ्याने ५३ हजार झाडे लावण्याच्या मोहिमेची खिल्ली सरकारनामाशी बोलताना उडवत घऱचा आहेर दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT