MP Sunil Tatkare News: 'सरकारमध्ये सहभागी झालो तेव्हाच मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टता झाली'; तटकरेंनी सांगितली 'मन की बात'

NCP News : 'सकारात्मक पद्धतीने काम करणार आहोत. कुणीही नाराजी नाही'
Sunil Tatkare News
Sunil Tatkare NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: राज्य सरकारमध्ये आम्ही जेव्हा सहभागी झालो तेव्हाच मुख्यमंत्री पदावरून स्पष्टता झाली आहे. आम्ही 'एनडीए'चे घटक आहोत. मुख्यमंत्री पद दादांना मिळावे, अशी राज्यातील अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आणि अपेक्षा आहे. मात्र, आता आम्ही महायुती केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाचाचा विषय नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (अजित पवार गट) यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त सतेज करंडक व पुणे लीग कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या पुरस्कार वितरणानंतर तटकरे बोलत होते.

Sunil Tatkare News
Ahmednagar News : अजितदादांमुळे निर्णय प्रक्रियेला गती; आमचा संसारही उत्तम चाललाय : विखे पाटील मोजक्या शब्दांत नेमके बोलले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी काय म्हणावे, त्यावर मी प्रतिक्रिया देणे योग्य नाही. टीका टिप्पणी पासून अलिप्त राहणे आणि राज्याच्या विकासाला प्राधान्य देण्याचे काम आम्ही करत आहोत, असे तटकरे म्हणाले.

अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार आहेत, असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी केले होते. त्यावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, आम्ही एकत्र काम केले आहे.

Sunil Tatkare News
BJP News : मोदींच्या 'घर चलो' अभियानाचा नारळ नागपुरात फुटला

सकारात्मक पद्धतीने काम करणार आहोत. कोणी ही नाराजी नाही, शिवसेना (Shivsena) आमदारांमध्येही नाराजी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सगळ्यांना निधी देऊन न्याय दिला आहे. आगामी काळात 'एनडीए' बरोबर काम करण्याचा मानस तयार केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com