Sarkarnama
पुणे

Chhagan Bhujbal : मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्यातील 4 गाड्या एकमेकांवर आदळल्या; घटनास्थळी खळबळ, नेमकं काय घडलं?

Maharashtra minister Chhagan Bhujbal accident news : मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांवर आदळल्याची घटना घडली. या अपघातामुळे घटनास्थळी मोठी खळबळ उडाली. जाणून घ्या सविस्तर बातमी.

Rashmi Mane

मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे हा अपघात घडला. प्रवासादरम्यान ताफ्यातील 4 गाड्या एकमेकांवर आदळल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसून छगन भुजबळ सुखरूप असल्याची माहिती आहे.

मंत्री छगन भुजबळ हे पुणे जिल्ह्यातील ओतूर दौऱ्यावर होते. येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनासाठी ते उपस्थित राहिले होते. ओतूरमधील एका नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर ते पुढील कार्यक्रमस्थळाकडे रवाना झाले. मात्र, याच प्रवासादरम्यान त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला.

नेमका अपघात कसा घडला?

छगन भुजबळ यांच्या ताफ्यात अनेक वाहनांचा समावेश होता. प्रवास सुरू असताना ताफ्यातील व्हॅनिटी व्हॅन अचानक पोलिसांच्या वाहनाला धडकली. या धडकेनंतर मागून येणाऱ्या वाहनांचीही एकमेकांना धडक बसली. त्यामुळे ताफ्यातील एकूण 4 गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातामुळे काही काळ ताफ्यातील वाहनांची हालचाल विस्कळीत झाली.

या अपघातानंतर छगन भुजबळ यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. ते पूर्णपणे सुरक्षित असून अपघातानंतर पुढील कार्यक्रमस्थळी पोहोचल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्यातील 4 वाहनांचा अपघात झाल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली, तरी व्हीआयपी ताफ्याच्या प्रवासादरम्यान वाहनांमधील अंतर आणि सुरक्षेच्या व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT