Shrikant Shinde
Shrikant Shinde Sarkarnama
पुणे

Shrikant Shinde : मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार शिंदे भाजपा नेत्यांवर संतापले; म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Shrikant Shinde News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्राचे राजकारण गेल्या सुमारे पंधरा दिवसांपासून चांगलंच तापलं आहे. या राजकारणातून सत्ताधारी भाजपावर रोज नवे आरोप होत आहेत. त्यात भर म्हणून भाजपाचे नेते रोज काहीतरी वक्तव्ये करीत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी (Bhagat Singh Koshyari) यांची हकालपट्टी करावी, यासाठी सर्वच विरोधक आक्रमक झाले आहेत. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी लावून धरली आहे.

या पार्श्वभूमीवर इतिहासाची माहिती नसलेल्या लोकांनी काहीतरी बोलून समाजात गैरसमज निर्माण करू नयेत, रोज नवा वाद निर्माण करणारी वक्तव्ये करू नयेत, असा टोला भाजपा नेत्यांना लगावला. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात मेळावा झाला. शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil), मावळचे खासदार श्रीरंग बारणे (shrirang barne), यांच्यासह शिंदे गटातील अनेक नेते पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते.

गेल्या पाच महिन्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात वेगाने काम होत आहे. सामान्य माणासाशी संबंधित अनेक विषय या काळात मार्गी लावण्यात यश मिळाल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. याउलट आधीच्या सरकारच्या काळात कामे होत नव्हती. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची दारे कायम बंद होती. ती आता केवळ नेत्यांसाठीच नव्हे तर सामान्य माणसासाठी देखील खुली झाली आहेत. लोकांना दोन सरकारमधील फरक लक्षात येत असल्याचा दावा, खासदार डॉ. शिंदे यांनी केला.

शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना काही लोक दुसऱ्यांची सकाळ रोज खराब करण्याचा उद्योग करीत असतात. मात्र, अशा लोकांकडे लक्ष न देता आपण आपले काम करीत राहिले पाहिजे, असे खासदार शिंदे म्हणाले. कोणताही उद्योग नसलेले लोक रोज नवे काहीतरी बोलत राहतात. मुळात राज्यातील सरकारचे काम उत्तमरित्या सुरू असल्याने काहीजणांच्या पोटात गोळा आला आहे. त्यातून रोज नवी काहीतरी टीका करून सरकारच्या कामगिरीविषयी साशंकता निर्माण करण्याचा केवीलवाणा प्रयत्न ही मंडळी करीत असल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT