Pimpri Chinchwad-Eknath Shinde Sarkarnama
पुणे

Pimpri Chinchwad Corruption : पिंपरी पालिकेतील गैरव्यवहारात मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष; आयुक्तांना मागितला अहवाल

सरकारनामा ब्यूरो

Pimpri News : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागातील अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचाराची वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पालिकेतील भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी नगरविकासमंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या वर्षी २२ डिसेंबर रोजी केली होती. नगरविकास विभागाने त्याची सहा महिन्यांनी दखल घेत पिंपरी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. (Chief Minister Shinde asked for a report on corruption in Pimpri Corporation)

करसंकलन विभागात अनागोंदी कारभार सुरू असून प्रचंड गैरव्यवहार (corruption) होत असल्याची तक्रार वाघेरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली होती. या गैरव्यवहरामध्ये मिळकतकर विभागातील शिपायापासून सहायक आयुक्तांपर्यंत साखळी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. गैरकारभाराची उदाहरणेही त्यांनी दिली होती.

पिंपरी चिंचवड (Pimpri chinchwad) महापालिकेचे (Corporation) कोट्यवधी रुपयांचे आणि राज्य सरकारचेही मुद्रांक व नोंदणी शुल्कापोटी लाखो रुपयांचे नुकसान त्यामुळे झाले आहे, असा दावाही त्यांनी केला होता. गेल्या वर्षी केलेल्या या मेलची दखल सहा महिन्यानंतर नगरविकास विभागाकडून घेण्यात आली. नगरविकास विभागाने यासंदर्भात आपला अहवाल देण्यास पिंपरी पालिका आयुक्तांना सांगितले आहे.

करसंकलन विभागातील गैरव्यवहाराच्या पुराव्यासह १९ तक्रारी शहरांतील विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्तांकडे केल्या होत्या. मात्र, त्याची त्यांनी दखल न घेतल्याने नगरविकासमंत्री तथा मुख्यमंत्र्यांकडेच ही तक्रार वाघेरे यांनी केली होती. त्यामुळे करसंकलन विभाग आणि त्यांचे सहायक आयुक्त यांना पालिकेचे आयुक्त हे पाठिशी घालत गैरव्यवहार आणि नियमबाह्य कामकाजाला मूकसमंती देत आहेत का, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT