Chinchwad By-Election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेर नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. काटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असताना शिवसेनेचे इच्छुक नेते राहूल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. यामुळे आता कोटेंसमोर मोठी समस्या निर्माण झाला आहे. आता कलाटेंची बंडखोरी शमावण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र कलाटे हे अपक्ष उमेदवारी दाखल करणारच यावर ठाम आहेत. "माझ्या सोबत शिवसैनिकांची ताकद आहे, म्हणत त्यांनी ते निवडणुकीत उभे असणार आहेत.
राहुल कलाटे म्हणाले, "चिंचवड विधानसभेची जर एकंदर पाहिली, तर इथे राष्ट्रवादी काँग्रेस चालत नाही. त्यावेळी दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी देखील मागच्या विधानसभेला अपक्ष लढले होते. मी पण अपक्षच लढलो होतो. २०१९ ला इथून कोणी लढायला तयार नव्हतं. आता जे सगळे उमेदवार पुढे आले आहेत ते २०१९ लाट पाहिल्यानंतर तेव्हा सगळे घरी बसले. मी जेव्हा अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी आम्हालाविविध संघटनांनी पाठींबा दिला. "
"एकंदर चिंचवडच्या लोकांचा तुम्ही मूड पाहिला, तर त्यावेळेस देखील त्यांनी मला लक्षणीय मते दिली. १ लाख १२ हजार मते दिली. एक आश्वासक चेहरा म्हणून माझ्याकडे पाहिलं गेलं. खूप विविधता असलेला हा मतदारसंघ आहे. येथल्या वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. याचा समन्वय साधूव याचा विचार केला पाहिजे. त्यावेळीस देखील एक लाख लोकांनी माझा चेहरा पाहून मतदान दिलं. या ठिकाणी जनता मत देणार आहे, नेते नाही. मला जनता निवडून देणार आहे. अजितदादा नाही, तर जनता जनार्धन निर्णय करणार आहे. यामुळे चिंचवडमधील मतदार काय म्हणतात, हे महत्त्वाचं आहे," असे कलाटे म्हणाले.
दरम्यान, राहुल कलाटे यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केले. तुम्ही कोणाचे उमेदवार असं विचारल्यावर ते म्हणाले. “मी पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेचा गटनेता आहे. मी शिवसेना पक्षाकडून नगरेसवक म्हणून निवडून आलो आहे. मात्र आपण महाविकास आघाडीकडे उमेदवारीचा मागितली होती. मला आशा होती की, महाविकास आघाडी म्हणून माझ्या उमेदवारीचा विचार केला जाईल. कारण २०१९ मध्ये मी शिवसेना बंडखोर म्हणून अपक्ष निवडणूक लढवलो. मला चिंचवडमधील जनतेनेकडून प्रचंड प्रेम मिळालं. तब्बल १ लाख १२ हजारांच्या पेक्षा जास्त मते मला मिळाली होती."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.