Chinchwad By-Election : कलाटेंच्या बंडखोरीवर अजितदादा म्हणाले, "ऐकायचं की नाही..."

Chinchwad By-Election : आम्ही त्यांना समजावू...
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Chinchwad By-Election : पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नाट्यमय़ घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी उमेदवार नाना काटे यांनी महाविकास आघाडीचे म्हणून उमेदवारी दाखल केलं असताना, या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. कलाटेंची समजूत काढण्याचा प्रयत्न आता निष्फळ ठरल्याने महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. यावर विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, "चिंचवडसाठी १० उमेदवार इच्छुक होते, शिवसेनेचे राहुल कलाटे यांच्याशी देखील मी बोललो. त्यानंतरच उमेदवारीबाबत अंतिम निर्णय झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे यांची घोषणा करण्यात आली होती. आता राहुल कलाटे यांना समजवण्याचा आम्ही प्रयत्न करू. मात्र आता, ऐकायचं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे."

Ajit Pawar
NCP : कार्यालयाला नोटीस येताच राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाचे घूमजाव, शरद पवारांनी केले होते उद्घाटन...

दरम्यान, राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केले. तुम्ही कोणाचे उमेदवार असं विचारल्यावर ते म्हणाले. “मी पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेचा गटनेता आहे. मी शिवसेना पक्षाकडून नगरेसवक म्हणून निवडून आलो आहे. मात्र आपण महाविकास आघाडीकडे उमेदवारीचा मागितली होती. मला आशा होती की, महाविकास आघाडी म्हणून माझ्या उमेदवारीचा विचार केला जाईल. कारण २०१९ मध्ये मी शिवसेना बंडखोर म्हणून अपक्ष निवडणूक लढवलो. मला चिंचवडमधील जनतेनेकडून प्रचंड प्रेम मिळालं. तब्बल १ लाख १२ हजारांच्या पेक्षा जास्त मते मला मिळाली होती."

Ajit Pawar
Abhijeet Bichkule : "भकास कसब्याला मी सजवणार"; अभिजीत बिचुकलेंनी भरला पत्नीचा अर्ज

आज नाना काटे यांचा उमेदवारा अर्ज दाखल करताना तिथे शिवसेनेचे स्थानिक नेते उपस्थित आहेत आता शिवसेना ठाकरे गटाची भूमिका काय असे विचारले असता ते म्हणाले, शिवसैनिक माझ्याच सोबत, असं म्हणत उत्तर दिलं. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी कलाटे यांची भेट घेतली होती. त्यांचा मन वळवण्याच प्रयत्न केला. मात्र यामध्ये शेळकेंना यश आलेले नाही. त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com