Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
पुणे

अखेर ठरले : चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार..

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने राज्य शासनाकडून काही निर्बंध शिथील करण्यात येत आहे. शाळा, मंदिरानंतर आता राज्य शासनाने राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरनंतर सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी आरोग्याचे काही नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे.

यासंदर्भात सविस्तर कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच, निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सुमारे दिड वर्षापासून मनोरंजन क्षेत्र ठप्प होते. बॉलिवूडसाठी देशातील अनेक राज्यांमध्ये चित्रपटगृह सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली, लखनौ येथे सिनेमागृह सुरू आहेत. यामुळे महाराष्ट्रातील सिनेमागृह सुरु करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. यासदर्भात अखेर आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे.

नाट्यगृह बंद असल्याने मनोरंजन इंडस्ट्रीमधल्या अनेक कलाकारांना अडचणीचा सामना करावा लागत होता. कामच नसल्याने आर्थीक गणिते बिघडली होती. मात्र, आता नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने सिनेसृष्टीतील कलाकारांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटण्यास मदत मिळणार आहे. या निर्णयाचे अनेक कलाकारांनी स्वागत केले आहे.

नाट्यगृह सुरु करण्यात यावे यासाठी या आधी अनेक कलाकारांनी राज्या शासनाकडे मागणी केली होती. मात्र, कोरोना प्रादुर्भाव कमी होत नसल्याने खबरदारी म्हणून परवानगी देण्यास शासणाने टाळले होते. मात्र, आता कोरोना परिस्थिती नियत्रंणात येत असल्याचे शाळा व मंदिरापाठोपाठ चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT