Abhijeet Dipke Sarkarnama
पुणे

CJP Maharashtra : दिल्लीनंतर आता महाराष्ट्र; अभिजीत दीपके लाखो तरुणांसह शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या मुद्यावरून लढा उभारणार?

Cockroach Janata Party, Maharashtra movement, पुण्यातील विशेष बैठकीत आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरणार; लाखो तरुणांसह शिक्षकांच्या प्रश्नांवर अभिजीत दीपके पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत

Sudesh Mitkar

Pune news : थेट दिल्लीच्या जंतर मंतरवर धडक देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके आता पुन्हा एकदा पुण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. पुढील आठवड्यात पुण्यात झालेल्या आंदोलनाच्या प्रमुख संयोजकांची आणि सहकाऱ्यांची एक विशेष बैठक पुण्यात पार पडणार आहे.

नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे पुण्यातील कॉकरोच पार्टीच्या एका प्रमुख कार्यकर्त्याने अभिजीत दीपके यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीत आंदोलनाची पुढील रणनीती आणि पुणे दौऱ्याचे नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली. या संपूर्ण आंदोलनात आणि उपक्रमात ज्या-ज्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी मदत केली आहे, त्या सर्वांसाठी एका विशेष बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.

महाराष्ट्रात नव्या एल्गाराची तयारी

आतापर्यंत देशभरातील विद्यार्थी आणि तरुणांच्या मुद्द्यांना व्यासपीठ मिळवून दिल्यानंतर, आता कॉकरोच पार्टी महाराष्ट्रातील स्थानिक घोटाळ्यांना हात घालण्याच्या तयारीत आहे. ड्रग्ज इन्स्पेक्टर भरती, टीईटी पेपरफुटी आणि भरती घोटाळे या विषयांवर कॉकरोच पार्टीच्या वतीने महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. संभाजीनगरमधील भेटीदरम्यान यावर प्राथमिक चर्चा पार पडली असून आंदोलनाची नेमकी दिशा आणि रूपरेषा पुढील आठवड्यात होणाऱ्या पुण्यातील बैठकीत स्पष्ट होणार आहे.

पूर्वी अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात पुण्यात झालेले आंदोलन आणि त्यानंतर दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर-मंतर येथे झालेले अभूतपूर्व आंदोलन चांगलेच गाजले. या आंदोलनाच्या यशानंतर दीपके यांचे राजकीय आणि सामाजिक वजन वाढले असून, आता पुन्हा एकदा पुणे हेच त्यांच्या आगामी महाराष्ट्रातील आंदोलनाचे केंद्रस्थान ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान महाराष्ट्रातही ठिकठिकाणी मोर्चे निघाले होते. या मोर्चांना तरूणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. प्रामुख्याने पुणे, मुंबई, नागपूर या महानगरांमध्ये जेन जीने कॉक्रोच जनता पार्टीला डोक्यावर घेतले होते. त्यामुळे आता महाराष्ट्रातील मुद्द्यांवर दीपके मैदानात उतरल्यास किती प्रतिसाद मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT