Bihar politics : भाजप आमदाराचा तडकाफडकी राजीनामा; बड्या नेत्याच्या लेकाचं मंत्रि‍पद वाचविण्यासाठी पक्षानेच केला 'प्लॅन'

Devesh Kumar resignation, BJP MLA : बिहारमध्ये उपेंद्र कुशवाह यांचा काही भागात वरचष्मा आहे. त्यांच्या लेकाचे मंत्रिपद वाचविण्यासाठी भाजपने आपल्या आमदाराचा बळी दिल्याची चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू झाली आहे.
Bihar politics : भाजप आमदाराचा तडकाफडकी राजीनामा; बड्या नेत्याच्या लेकाचं मंत्रि‍पद वाचविण्यासाठी पक्षानेच केला 'प्लॅन'
Published on
Updated on

Bihar BJP update : बिहारमधून मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार देवेश कुमार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अत्यंत गुप्तपणे घडलेल्या या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या राजीनाम्याबात कुमार किंवा भाजपने अधिकृतपणे आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे यामागचे गुढ वाढले आहे.

देवेश कुमार यांची गाडी शुक्रवारी दुपारी अचानक विधान परिषदेमध्ये मुख्य प्रवेशद्वाराऐवजी मागील गेटने आत आली. तर मुख्य प्रवेशद्वारातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी आणि अन्य नेते विधान परिषदेत दाखल झाले. त्यानंतर कुमार यांनी विधान परिषदेचे सभापती अवधेश नारायण सिंह यांच्याकडे सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला. नेत्यांच्या उपस्थित घडलेल्या या घडामोडींमुळे चर्चांना उधाण आले आहे.

भाजप नेत्यांकडून या राजीनाम्याबाबत चुप्पी साधण्यात आली आहे. दरम्यान, आता या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तूळात दीपक प्रकाश यांचे नाव पुढे आले आहे. ते पंचायत राज मंत्री आहेत. मात्र, सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातही ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना मंत्रि‍पदावर चार महिन्यांहून अधिक काळ होते. तर सम्राट चौधरी यांच्या नेतृ्त्वाखालील मंत्रिमंडळातही तीन महिन्यांपासून मंत्री आहेत.

Bihar politics : भाजप आमदाराचा तडकाफडकी राजीनामा; बड्या नेत्याच्या लेकाचं मंत्रि‍पद वाचविण्यासाठी पक्षानेच केला 'प्लॅन'
BJP news : धर्मेंद्र प्रधानांनंतर भाजपला आणखी एक मोठा धक्का; विरोधकांची बोलती बंद करणाऱ्या राष्ट्रीय प्रवक्त्याचा पक्षाला रामराम

दीपक प्रकाश यांच्या मंत्रि‍पदाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. याबाबत कोर्टाने नुकताच सरकारला सवाल केला होता. एखादा मंत्री सहा महिन्यांच्या आता विधानसभा किंवा विधानपरिषदेचचा सदस्य बनला नाही तर तो मंत्रि‍पदावर कसा राहू शकतो, असे कोर्टाने म्हटले होते. याबाबत सरकारने घटनात्मक आधार स्पष्ट करावा, असे कोर्टाने सूचित केले होते.

सप्रीम कोर्टातील या निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर दीपक प्रकाश यांचे मंत्रिपद जाणार की राहणार, याबाबत उत्सुकता वाढली होती. त्यातच भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदाराने राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आता दीपक प्रकाश यांना संधी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दीपक प्रकाश हे राष्ट्रीय लोक मोर्चा पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांचे पुत्र आहे. हा पक्ष एनडीएमध्ये आहे. कुशवाह हे राज्यसभेचे खासदारही आहेत.

Bihar politics : भाजप आमदाराचा तडकाफडकी राजीनामा; बड्या नेत्याच्या लेकाचं मंत्रि‍पद वाचविण्यासाठी पक्षानेच केला 'प्लॅन'
Raghav Chadha news : माझा 'रोल' बदललाय!अखेर राघव चड्ढा पेपरफुटीवर बोलले अन् तोंडावर आपटले...

बिहारमध्ये कुशवाह यांचा काही भागात वरचष्मा आहे. त्यांच्या लेकाचे मंत्रिपद वाचविण्यासाठी भाजपने आपल्या आमदाराचा बळी दिल्याची चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू झाली आहे. दीपक प्रकाश यांचे मंत्रिपद वाचविण्यासाठी कुशवाह यांच्याकडूनही दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याची चर्चा होती. मात्र, विधानपरिषदेची एकही जागा रिक्त नसल्याने अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे भाजपने आपल्याच आमदाराला राजीनामा देण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com