Pune News : महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर राज्यात आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाकाच लावला आहे. सातत्यानं सरकारकडून प्रशासकीय विभागात मोठ्या प्रमाणात खांदेपालट केले जात आहे. यातच आता पुण्यातूनही एक मोठी अपडेट समोर येत आहे. पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी आता नवल किशोर राम (Naval Kishor Ram) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते येत्या 1 जूनपासून पदभार स्विकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्य सरकारकडून बुधवारी(ता.21) नवल किशोर राम यांच्या पुणे महापालिकेचे नवे आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश काढले आहेत. पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले हे 31 मे 2025 रोजी सेवेतून निवृत्त होत आहे. त्याचमुळे नवल किशोर राम यांची पुणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी राजेंद्र भोसले यांची पुण्याचे नवे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी पुणे महापालिका (PMC) आयुक्तपदी असलेल्या विक्रम कुमार यांची बदली करण्यात आली होती. त्यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अतिरिक्त महानगर आयुक्तपदी बदली करण्यात आली होती.
विक्रम कुमार हे त्यापूर्वी पुणे (Pune) महापालिका आयुक्त होते.त्यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अतिरिक्त महानगर आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. ते 2004 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या कुमार यांची जुलै 2020 मध्ये पीएमसी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आणि नंतर 15 मार्च 2022 रोजी ते प्रशासक बनले होते.
तर त्यांच्याजागी पुणे महापालिका आयुक्तपदी राजेंद्र भोसले यांची नियुक्ती झाली होती. आता राजेंद्र भोसले हे 31 मे 2025 रोजी सेवेतून निवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी नवल किशोर राम यांची पुणे महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवल किशोर राम हे यापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी राहिलेले आहेत.त्यांची सौरभ राव यांच्या जागी एप्रिल 2018 मध्ये नवल किशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी वर्णी लागली होती.
याआधी नवल किशोर राम यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेचे सीईओ,बीड,औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारीपदानंतर त्यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती.
नवल किशोर राम पुणे महापालिकेचे नवीन आयुक्त असणार आहेत. राम हे 2007 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.ते मूळ बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील मोतीहारी गावचे आहेत. 2007 मध्ये ते त्यांची आयएएसमध्ये निवड झाली. राम यांची पहिली नियुक्ती नांदेड येथे झाली होती. त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत दोन वर्षे काम केले. बीड व तेव्हाचे औरंदबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे.
2020 मध्ये नवल किशोर राम हे पुण्याचे जिल्हाधिकारी होते. कोरोना काळात त्यांनी गावोगावी जाऊन भेटी दिल्या होत्या. देशभरातील सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं. पुण्यातून त्यांची थेट पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.