Eknath Shinde and Amol Kolhe  Sarkarnama
पुणे

CM Shinde Shirur Daura: मुख्यमंत्री शिंदे येणार शिरुरच्या दौऱ्यावर; कोल्हे म्हणाले, 'मनापासून स्वागत...'

Eknath Shinde and Amol Kolhe : अजित पवारांनंतर आता मुख्यमंत्री शिंदेंनीही वाढवलं कोल्हेंचं टेन्शन

Sudesh Mitkar

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचे 'मिशन 45' पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही मैदानात उतरणार आहेत. नव्या वर्षात 6 जानेवारीपासून शिंदे महिनाभर राज्यातील विविध भागांचा दौरा करणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे 10 जानेवारीला मराठवाड्यातील हिंगोली, धाराशिवमध्ये असतील. तर 11 जानेवारीला परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यादरम्यान 21 जानेवारीला ते शिरूर, मावळच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यावरून आता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

संसदेतून निलंबित केल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी (शरद पवार गटांचे) खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी 'शेतकरी आक्रोश मोर्चा'चे आयोजन केले होते. या मोर्चाच्या माध्यमातून कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवावी तसेच कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे, खासगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे. तसेच बिबटप्रवण तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा व्हावा, पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून नुकसानभरपाई तातडीने मिळावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित स्वरूपाचे 'शैक्षणिक कर्ज' धोरण लागू करावे, या प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता मुख्यमंत्री शिरूरमध्ये येत असताना त्याबाबत कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली. कोल्हे म्हणाले, 'मुख्यमंत्री शिवसंकल्प यात्रेची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करत आहेत. त्याबद्दल मी मुख्यमंत्री शिंदे यांचे मनापासून स्वागत करतो. शेतकरी आक्रोश मोर्चाचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाय म्हणून या यात्रेची सुरुवात मुख्यमंत्री शिरूर मतदारसंघापासून करत आहेत.

मुख्यमंत्री येत आहेत, तर लादलेली कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, बिबटप्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट पुरवावी, दूध उत्पादकांना सरसकट पाच रुपये अनुदान द्यावे, तरच शिवसंकल्प हेच आपल्या अभियानाचे नाव सार्थ ठरेल, असा टोला कोल्हे यांनी लगावला.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT