Karad Congress News : मोदींच्या फसव्या घोषणांचा पर्दाफाश करण्यासाठी युवक काँग्रेसचा आक्रोश मशाल मोर्चा

Karad Mashal March मशाल मोर्चा कराडच्या दत्त चौकातुन जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापर्यंत काढण्यात आला. तेथे त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
Karad Youth Congress Mashal March
Karad Youth Congress Mashal Marchsarkarnama
Published on
Updated on

Karad Congress News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दिलेली खोटी आश्वासने, वाढलेली बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, सरकारी नोकर भरती व स्पर्धा परीक्षेतील घोटाळा, महिलांवरील अत्याचार, शेतकरी विरोधी धोरण आदी फसव्या घोषणांचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने येथे युवा आक्रोश मशाल मोर्चा काढण्यात आला.

युवक काँग्रेसच्यावतीने Youth Congress आयोजित युवा आक्रोश मोर्चास कराड Karad येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन प्रारंभ करण्यात आला. मोर्चा दत्त चौकातुन जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापर्यंत काढण्यात आला. तेथे त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

हा मशाल मोर्चा गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारने दिलेली खोटी आश्वासने, वाढलेली बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, सरकारी नोकर भरती व स्पर्धा परीक्षेतील घोटाळा, महिलांवरील अत्याचार, शेतकरी विरोधी धोरण आदी फसव्या घोषणा यांचा पर्दाफाश करण्यासाठी काढण्यात आल्याचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानू चीब, सहप्रभारी एहसान खान, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, शिवराज मोरे, दीपक राठोड, श्रीनिवास नालमवार, तारिक बागवान, अनिकेत नवले, अमरजीत कांबळे,अमित जाधव, दिग्विजय पाटील, अजित केंजळे, निवासराव थोरात, ऋतुराज मोरे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, देवदास माने, गणेश उबाळे, राजेंद्र यादव, श्रीकांत मुळे, अभिजित चव्हाण, दिग्विजय सूर्यवंशी, मुबीन बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By Umesh Bambare

Karad Youth Congress Mashal March
Question of Congress workers : तुमच्या निवडणुकीत ‘हात’ हातात घेता, मग आमच्या निवडणुकीत का भांडता?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com