Cockroach Janata Party | Abhijeet Dipke | Viral Movement Sarkarnama
पुणे

​Cockroach Pune Protest:...म्हणून 'कॉकरोच जनता पार्टी'ने आंदोलनासाठी पुणे निवडलं;अभिजीत दिपकेंचं राजकीय कनेक्शन समोर?

Pune Protest Abhijit Dipke Political Links : कॉकरोच जनता पार्टी उद्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन करणार आहे. दिल्लीनंतर पुणे आंदोलनासाठी निवडण्यामागे राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा आहे.

Sudesh Mitkar

Pune News : दिल्लीत गाजलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाची धग आता पुण्यात पोहोचणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत शड्डू ठोकल्यानंतर, या पार्टीचे नेते अभिजीत दिपके यांनी आता महाराष्ट्रातील पहिल्या आंदोलनासाठी थेट विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याची निवड केली आहे.

उद्या दुपारी ४ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हे आंदोलन पार पडणार असून विद्यापीठाने काही अटी-शर्तींसह या आंदोलनाला परवानगी दिली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत झालेले 'कॉकरोच जनता पार्टी'चे पहिले आंदोलनाला अपेक्षित यश न मिळाल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दिल्लीत अपेक्षित गर्दी जमवण्यात या पार्टीला अपयश आले. त्यामुळे दिल्लीतली कसर पुण्यात भरून काढण्यासाठी दिपके यांनी कंबर कसली आहे. मात्र, दिल्लीत 'फ्लॉप' ठरलेले हे आंदोलन पुण्यात कितपत यशस्वी होणार, याबाबत आतापासूनच राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दिपकेंचे 'पुणे कनेक्शन' काय?

महाराष्ट्रात इतर कुठल्याही शहराऐवजी पुण्यातच हे पहिले आंदोलन का होत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण यामागे अभिजीत दिपके यांचे जुने 'पुणे कनेक्शन' आणि राजकीय भूतकाळ कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. दिपके हे पुण्यातील एका मोठ्या राजकीय पक्षासाठी सक्रियपणे काम करत असल्याची चर्चा आहे.

२०१८-१९ दरम्यान अभिजीत दिपके हे पुण्यामध्ये 'आम आदमी पार्टी'च्या (आप) युवक कार्यकारिणीमध्ये प्रचंड सक्रिय होते. इतकेच नव्हे तर 'आप'च्या तत्कालीन युवक कार्यकारिणीचे अध्यक्षपदही त्यांच्याकडेच होते. या काळात त्यांनी पुण्यातील तरुण आणि विद्यार्थ्यांचे मोठे जाळे निर्माण केले होते.

नेटवर्कचा वापर ?

'आप'च्या काळातील याच 'पुणे कनेक्ट' आणि तरुणांमधील थेट संपर्काचा वापर करून दिपके यांनी पुण्यात आंदोलनाचे जाळे विणल्याचे बोलले जात आहे. जुन्या नेटवर्कच्या भरवशावर पुण्यात शक्तीप्रदर्शन करण्याचा हा त्यांचा प्लॅन यशस्वी होणार का याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

दिल्लीत तोंडघशी पडल्यानंतर आता पुण्यातील या 'पुणे कनेक्शन'चा फायदा अभिजीत दिपके यांना किती होणार? ते पुण्यात गर्दी खेचण्यात यशस्वी ठरणार की हे आंदोलनही दिल्लीसारखेच 'फ्लॉप' ठरणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT