

Pune News: कृषिमंत्री आणि वाद हे समीकरण महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत अनेकदा दिसून आलं आहे. इतकंच नव्हे तर सातत्यानं वादांत अडकलेल्या नेत्यांना आपलं कृषिमंत्री पदही गमवावं लागल्याची वेळही आली आहे. आता पुन्हा एकदा कृषिमंत्री आणि नव्या वादाला तोंड फोडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राज्याचे कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंबाबतचा वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कृषिमंत्री दत्ता भरणेंनी जळालेल्या उसाच्या पंचनाम्याविषयीची तक्रार घेऊन गेलेल्या शेतकऱ्याची थट्टा उडवल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात खडकवासला पाण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. याच आंदोलनातील एक शेतकरी त्याच्या पाण्यावाचून जळालेल्या उसाच्या पंचनाम्याविषयीची तक्रार घेऊन भरणेवाडी येथे गेला होता. पण त्यावेळी आलेल्या शेतकऱ्याची तक्रार ऐकून घेण्याऐवजी मंत्री दत्तात्रय भरणेंनी त्याचीच खिल्ली उडवत त्याला भेट नाकारल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल माध्यमात प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत संबंधित शेतकरी मंत्री भरणे यांना "मामा जळालेल्या ऊसाचे पंचनामे,त्यावर माझ्याकडे नाही तुमचं,मी साधा माणूस आहे. गरीब माणूस आहे. तुम्ही मोठी माणसं आहात सगळी असं म्हणत तक्रारदार शेतकऱ्याची खिल्ली उडवल्याचं दिसतंय.
तसेच यावेळी भरणेमामांनी तुम्ही मोठ्या माणसाचं ऐकून आंदोलनं करणार,तुम्हाला ज्याने हे सांगितलं, त्याला सांगा असं म्हणत भेटही नाकारली. त्यावर शेतकरी म्हणतो, मामा तुम्ही शब्द दिला होता. त्यावर मंत्री भरणे यांनी मी नाही तुम्हाला शब्द दिला असंही म्हटलं.
तक्रार घेऊन गेलेला शेतकरी व्हिडीओत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना तुम्ही सिंचन भवनला शब्द दिल्याची आठवण करुन देताना दिसून येत आहे. त्यावर मंत्री भरणे त्याला तुमचा आणि माझा काही शब्द नाही. तुम्ही आंदोलन केलं होतं असं म्हणतात. यानंतर मंत्री भरणे गाडीत बसून निघून जातात. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे कृषिमंत्र्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
इंदापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी 25 मे रोजी खडकवासल्याच्या पाण्यासाठी आंदोलन केलं होतं. या आंदोलनावरुन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढली होती. तसेच या नेत्यांनी दोन किंवा तीन जूनला पाणी येईल असा शब्द दिला होता. यानंतर शेतकऱ्यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं होतं.
गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या कृषी मंत्रिपदाचा कारभार आणि वाद यांचं समीकरण चर्चेत राहिले आहे. अब्दुल सत्तार,धनंजय मुंडे,माणिकराव कोकाटे, हेही कृषिमंत्री वादग्रस्त विधानं आणि घोटाळ्याचे आरोपांमुळे वेगवेगळ्या वादात सापडले होते. आता त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणेही वादात सापडले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.