Pune BJP  Sarkarnama
पुणे

Pune News : दोन गटाचा पोलीस ठाण्यातच राडा; भाजपच्या माजी नगरसेवकासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

BJP Ex-Corporator : दोन गटात झालेल्या वादातून पुणे शहरातील लष्कर पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याची घटना घडली.

सरकारनामा ब्यूरो

Lashkar Police Station : दोन गटात झालेल्या वादातून पुणे शहरातील लष्कर पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पुणे कॅन्टोन्मेंटचे भाजपचे माजी नगरसेवक विवेक यादव यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याच्या प्रकरणामध्ये परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उशीरा लष्कर परिसरात घडली आहे. या प्रकरणी विवेक यादव, संतोष यादव, सागर वैऱ्या, पंकज जगताप, सुशील यादव, शिवाजी उर्फ छत्या यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याच्या प्रकरणाबाबत अमित मोरे यांनी फिर्याद दिली. तर यादव यांच्या गटाकडून गणेश भुरेवार याने फिर्याद दिली. ही घटना 14 एप्रिलला रात्री उशीरा लष्कर भागात घडली.

नेमकं काय घडलं?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने लष्कर भागातून मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक बाटा चौकात आली. त्यावेळी मोरे याच्या ओळखीतील संतोष यादव, सागर वैऱ्या यांनी त्यास धक्का दिला. तर मोरेच्या मित्रालाही मारहाण केली.

यानंतर मोरे व त्याचे मित्र तक्रार देण्यासाठी लष्कर पोलीस ठाण्यात गेले. यावेळी तेथे माजी नगरसेवक विवेक यादव आले. यावेळी यादव आणि मोरे यांच्यात पुन्हा धक्काबुक्की झाली. या प्रकरणानंतर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शीतल जाधव करीत आहेत.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT