Congress sarkarnama
पुणे

घरगुती गॅस दरवाढीविरोधात कॉंग्रेस आक्रमक, भर पावसात केले आंदोलन

केंद्र सरकारने (Central Government) नुकतीच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ केली. त्यामुळे पन्नास रुपयांनी हा गॅस महाग झाला.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : केंद्र सरकारने (Central Government) नुकतीच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ केली. त्यामुळे पन्नास रुपयांनी हा गॅस महाग झाला. आता तो अकराशेच्या घरात पोचला आहे. या भाववाढीविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) कॉंग्रेसने (Congress) आज भर पावसात एक नाही, तर तीन ठिकाणी आंदोलन करीत केंद्र सरकारचा जोरदार निषेध केला.

दोन दिवसांपुर्वीच (ता.७) राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही या गॅस दरवाढीविरोधात भर पावसात पिंपरीत आंदोलन केले होते. त्यानंतर कॉंग्रेसने शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम (Dr. Kailash Kadam) यांच्या नेतृत्वात आज सायंकाळी ते केले. दिवसभर जोरदार पाऊस सुरु असल्याने त्याची तमा न बाळगता ते करण्यात आले. त्यात या दरवाढीची मोठी झळ बसलेल्या गृहिणींच्या वतीने कॉंग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या.

भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात ते करण्यात आले.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. डॉ. कदम, महिला शहराध्यक्षा सायली नढे, युवक शहराध्यक्ष कौस्तूभ नवले, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सेवादल अध्यक्ष विरेन्द्र गायकवाड, सहकार सेल अध्यक्ष के. हरिनारायण, एनएसयूआय प्रदेश उपाध्यक्ष अॅड. उमेश खंदारे, माजी नगरसेविका निर्मला कदम, छायावती देसले, डॉ. मनिषा गरूड, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे तसेच हिराचंद जाधव आदी त्यात सामील झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT