sharad pawar | Nana Patole sarkarnama
पुणे

Nana Patole News: लोकसभेनंतर नानांचा बदललाय बाणा..! म्हणाले, पवारसाहेबांनी एक पाऊल मागे घेतले असेल तर आम्ही...

Maharashtra Congress Politics : निवडणुकीमध्ये आघाडी टिकवण्यासाठी आम्ही एक पाऊल मागे आलो असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणत आहेत. मात्र ते...

Sudesh Mitkar

Pune News : लोकसभेमध्ये चांगले यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष विधानसभेसाठी जोरदार तयारी लागली आहेत. लोकसभा निवडणुकीतील विजय हा आपल्याच पक्षाच्या ताकदीमुळे झाल्याचा दावा महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट या तीनही पक्षांकडून केला जात आहेत. आता त्याच निकाल आणि स्टाइक रेटचा संदर्भ देत विधानसभेला आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याच्या हेतूने आघाडीत जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकतेच लोकसभेला आपण महाविकास आघाडी टिकावी म्हणून आपण एक पाऊल मागे आलो. मात्र विधानसभेला आपल्याला जास्त जागा मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली होती.त्यांच्या या विधानावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले. पवारसाहेब जर एक पाऊल मागे आलेले असतील तर आम्ही महाविकास आघाडी टिकावी म्हणून तीन पावले मागे आलो असल्याचे सांगत नानांनी आपला लोकसभेनंतर बदललेला बाणा दाखवला.

पुणे लोकसभेच्या पराभवानंतर नाना पटोले (Nana Patole) पहिल्यांदाच पुण्यात आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांचे संवाद साधला. पटोले म्हणाले, आम्ही कधीच स्वतःला मोठा भाऊ म्हणून संबोधत नाही. मात्र, माध्यमच आम्ही महाराष्ट्रात मोठा भाऊ असल्याचे बोलतात.

आम्ही राष्ट्रीय पक्ष असून ज्याप्रकारे आम्ही शोषित, पीडित लोकांना सोबत घेऊन चालतो, तसंच अन्याय झालेले पक्ष,जे भाजपाविरोधात लढतात, त्यांनादेखील सोबत घेऊन जाण्याची भूमिका आमची राहिली आहे.

निवडणुकीमध्ये आघाडी टिकवण्यासाठी आम्ही एक पाऊल मागे आलो असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणत आहेत. मात्र ते एक पाऊल मागे आले असतील तर आघाडी वाचवण्यासाठी आम्ही तीन पावलं मागे आल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.

भाजपा सरकार राज्यात समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करत असून राज्याच्या तिजोरीवर देखील डल्ला मारत आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी समविचारी पक्षांसोबत राहून मेरिटच्या आधारावर जागावाटप करून बहुमताचे सरकार महाराष्ट्रात आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

तीनही पक्षांतील स्थानिक नेते आपल्याला जास्त जागा मिळाव्यात यासाठी आग्रही आहेत. मात्र, अद्याप आमची जागा वाटपाबाबत बैठक झालेली नाही. ही बैठक झाल्यानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल आणि त्यानुसार जागावाटप होईल. मात्र, अद्याप तरी जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला निश्चित झाल्या नसल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच पुणे लोकसभेच्या पराभवाबाबत आज बूथनिहाय माहिती घेऊन कोणत्या बूथला मतदान कमी झालं आणि कुठे मतदान वाढलं याचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. तसेच यामुळे कोणी काम केले आणि कोणी काम केले नाही याची स्पष्टता येईल आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई देखील करणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT