Nana Patole, Satyajeet tambe Sarkarnama
पुणे

Nana Patole On Satyajeet Tambe : तांबे काहीही ओरडले तरी मी त्यावर का बोलावं; पटोलेंचा माध्यमांनाच खडा सवाल

Congress News : नाशिकमधील हा हाय होल्टेज ड्रामा सर्वपक्षीय आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nana Patole News : नाशिक पदवीधर निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी राज्य काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. यानंतर नाना पटोले या आरोपांना कसं प्रत्युत्तर देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र, नाशिकमधील हा हाय होल्टेज ड्रामा सर्वपक्षीय आहे. त्यामुळे तांबे हे काही ओरडले तरी बोललेच पाहिजे असं नाही अशा शब्दांत पटोलेंनी तांबे यांच्या आरोपांवर पलटवार केला आहे.

खडकवासला येथे आयोजित काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पटोले यांनी तांबे यांच्या आरोपांसह इतरही विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पटोले म्हणाले, तांबे यांच्याबाबत प्रवक्ते बोलतील. योग्य वेळी योग्य उत्तर द्यावं लागतं. काही ओरडलं काही बोललं तर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं गोदी मीडियाला सांगितलं असेल तर मला माहिती नाही.

पण नाशिक पदवीधरमध्ये सर्वपक्षीय हाय होल्टेज ड्रामा होता. त्यामुळे तांबे हे काही ओरडले तरी बोललंच पाहिजे असं नाही. त्यांच्यावर आमचे प्रवक्ते बोलतील. आणि त्यांच्या बोलण्यातून समाधान झालं नाही, तर मी बोलतो. माझ्याकडे भरपूर मसाला आहे असं आव्हान पटोले यांनी दिले.

तसेच राधाकृ्ष्ण विखे पाटील यांच्याबद्दल मी काही दिवसानंतर पद्धतशीर बोलणार आहे. मात्र, माझे मित्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची जागा विखे घेऊ पाहात आहेत असा टोलाही पटोले यांनी यावेळी लगावला.

अजित पवारांनी घरातील भांडण चव्हाट्यावर आणले...

सत्यजित तांबेंच्या उमेदवारीबाबत मी बाळासाहेब थोरातांशी बोललो आहे, नाना पटोलेंशी बोललो आहे असे अजित पवारच (Ajit Pawar) सांगत फिरत होते. तेव्हाच मी घरातील भांडणे घरात सोडवा असं म्हणालो होतो. मात्र, नंतर नाशिक पदवीधर निवडणुकीतील मविआ उमेदवारीची मतं आम्हीच मारली असं अजित पवार मविआतील घटक पक्ष असूनही म्हणाले आहेत. अजित पवार यांनी घरातील भांडण चव्हाट्यावर आणले आहेत. त्यांनी आमच्या पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही बरीच टीका केली आहे असा आरोपही पटोले यांनी केली आहे.

गरज संपली की फेकून देणे भाजपची नियत...

गरज संपली की फेकून देणे ही भाजप (Bjp) ची नियत आहे. मुक्ताताई आजारी असताना मतदानाला यायच्या, त्यांचे पती त्यांच्याबरोबर यायचे. एवढ्या निष्ठावंताला वेळेवर डावलले बरोबर नाही, अशा शब्दात कसब्यातून शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांना डावलल्यानं पटोले यांनी टीका केली. तसेच काँग्रेसने अजून कोणालाही उमेदवारी घोषित झालेली नाही. पक्षाच्या वतीने सर्व्हे करण्यात आलेला आहे. त्याचा अहवाल हाय कमांडला पाठवलाय त्या आधारावर उद्या रात्रीपर्यंत निर्णय येईल, असेही पटोले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT