Devendra Fadnavis-Sangram Thopte  Sarkarnama
पुणे

काँग्रेस आमदार संग्राम थोपटे या कारणासाठी देवेंद्र फडणवीसांना भेटले

भोर मतदारसंघातील विकासकामांवरील स्थगिती दूर करून कामे सुरु करावीत, यासाठी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यामुळे याला राजकीय वळण देऊ नये, असे आमदार थोपटे यांनी स्पष्ट केले

विजय जाधव

भोर (जि. पुणे) : काँग्रेसचे (congress) भोरचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची काल भेट घेतली होती. त्यानंतर पुण्यासह राज्यभरात त्यांच्या पक्षांतरांबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, खुद्द संग्राम थोपटे यांनी पक्षांतराबाबत भाष्य केले आहे. आम्ही विकासकामांसाठीही उपमुख्यमंत्र्यांना भेटू नये का? असा सवाल आमदार थोपटे यांनी केला आहे. (Congress MLA Sangram Thopte met Devendra Fadnavis for this reason)

फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीबाबत बोलताना आमदार थोपटे म्हणाले की, भोर मतदारसंघातील विकासकामांवरील स्थगिती दूर करून कामे सुरु करावीत, यासाठी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यामुळे याला राजकीय वळण देऊ नये आणि आम्ही विकासकामांसाठी पण उपमुख्यमंत्र्यांना भेटू नये का? असा प्रश्नही थोपटे यांनी उपस्थित केला.

आमदार संग्राम थोपटे यांनी शुक्रवारी (ता. 26 ऑगस्ट) दुपारी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर सुमारे १५ मिनिटे भेट घेतली होती. त्यावरून तालुक्यातच नव्हे; तर जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरु होत्या. त्यास आमदार संग्राम थोपटे यांनी पूर्णविराम दिला.

भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यातील रस्ते, बंधारे व पाझर तलावांच्या कामावर स्थगिती दिलेली आहे. ती दूर करून कामे सुरु करावीत, यासाठी मी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे थोपटे यांनी नमूद केले. आमच्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये, असेही आमदार संग्राम थोपटे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बहुमताच्या चाचणीवेळीही कॉंग्रेसचे तब्बल ११ आमदार गैरहजर होते. त्यात एका माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. तेव्हापासून कॉंग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे. काही दिवसांपूर्वी अस्लम शेख यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT