Rajendra Raut-Dilip Sopal
Rajendra Raut-Dilip SopalSarkarnama

ईडीची चौकशी लावतो, म्हणणाऱ्या राऊतांना सोपलांचे उघड चॅलेंज : ‘दोघांचीही चौकशी लावू...’

ढाळे पिंपळगाव, बाभळगाव, पाथरी, कोरेगाव प्रकल्प, धरणाची उंची वाढवणे, उपसा सिंचन योजना आदी कामे ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना केली आहेत. या कामांशी तुमचा काडीमात्र संबंध नाही.

बार्शी (जि. सोलापूर) : सक्तवसुली संचनालयाची (ईडी ED) चौकशी लावतो, असे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) जाहीर करतात. पण, तुम्ही काय धुतल्या तांदळासारखे आहात काय? आपण दोघे मिळून ईडीच्या कार्यालयात जाऊ आणि पत्र देऊ, दोघांचीही चौकशी लावू. हवे तर संयुक्त पत्र देऊ, दूध का दूध पानी का पानी होईल, असा इशारा माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांनी आमदार राजेंद्र राऊत यांना गुरुवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. (Former minister Dilip Sopal's open challenge to MLA Rajendra Raut)

मागील तीस वर्षे आम्ही विधानसभा सदस्य, कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले आहे. पंचेचाळीस वर्षे सक्रिय राजकारणात आहे. यापूर्वी बार्शी तालुका वाळवंट होते का? तालुक्यात नागरिक नव्हते का? जनता जगायला गेली होती का? पस्तीस दिवसांत विकास पुरुष अवतरले अन् कामाचा धडाका सुरु झाला. वाळवंटात बागायत फुलून गेली. विरोधकाला धांदात खोटे बोलायची सवय आहे, अशा शब्दांत माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आमदार राऊतांचा समाचार घेतला.

Rajendra Raut-Dilip Sopal
राष्ट्रवादीच्या माजी गटनेत्यावर प्राणघातक हल्ला; राऊतांची उच्च न्यायालयातून माघार

सोपल म्हणाले की, उपसा सिंचन योजनेस ५५० कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यता तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंजूर केली होती. मी आणि आमदार बबनदादा शिंदे पाठपुरावा करीत होतो. अर्थमंत्री फडणवीसांनी सुधारीत मान्यता आत्ता दिली आहे.   मोठाडं बोलायचे, खोटाड बोलायचा विरोधकाचा कार्यक्रम आहे. ढाळे पिंपळगाव, बाभळगाव, पाथरी, कोरेगाव प्रकल्प, धरणाची उंची वाढवणे, उपसा सिंचन योजना आदी कामे ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब मुख्यमंत्री असताना केली आहेत. या कामांशी तुमचा काडीमात्र संबंध नाही.

Rajendra Raut-Dilip Sopal
अभिजीत पाटलांच्या कारखान्यांसह घरावर दुसऱ्या दिवशीही इन्कम टॅक्सची कारवाई

 बार्शी तालुक्यातील अनेक रस्ते, अनेक पूल, आयटीआय, जिल्हा न्यायालय माझ्या कारकिर्दीमध्ये झालेले आहे. कावीळ झालेल्या माणसाला पिवळेच दिसणार. चांगली झालेली कामे बघायची नाहीत अन् यांना दिसतही नाहीत, असाही टोला सोपल यांनी राऊतांना लगावला.

Rajendra Raut-Dilip Sopal
पाशा पटेल यांच्यावर दुःखाचा डोंगर; मुलाचे अवघ्या ३८ व्या वर्षी निधन

आर्यन कारखान्याची एफआरपीची रक्कम तत्कालीन संचालक अविनाश भोसले यांनी देण्याचे न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे लेखी दिलेले आहे. सोपल कुटुंबाचा त्या रकमेशी काहींही संबंध नसून जिल्हा बँकेच्या रकमेबद्दल आम्ही न्यायालयात लढा देण्यास खंबीर आहोत आणि रक्कमही देण्यास सक्षम आहोत, असे सोपल यांनी या वेळी सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com