Rajni Patil ON Amit Shah Sarkarnama
पुणे

Rajni Patil: महापुरुषांचा अपमान करणं ही RSS-BJP ची विकृती; काँग्रेसचा हल्लाबोल

Congress MP Rajni Patil ON Home Minister Amit Shah: भाजपाच्या पोटात होते तेच ओठावर आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपाच्या मनात किती राग आहे ते उघड झाले. सत्ताधारी भाजपाने लोकसभेला आखाडा बनवले आहे.

Sudesh Mitkar

Pune News:केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमधील एका भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस सातत्याने भाजपला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे.

काँग्रेसकडून हा मुद्दा राज्यभरात उचलून धरण्याच्या दृष्टिकोनातून मुख्य शहरांमध्ये याबाबत पत्रकार परिषदा घेण्यात येत आहे. आज पुण्यात देखील खासदार रजनी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन वक्तव्‍य केल्याबद्दल शहांनी माफी मागावी व पंतप्रधानांनी ताबडतोब त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.

रजनी पाटील म्हणाल्या म्हणाल्या, "भाजपाच्या पोटात होते तेच ओठावर आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपाच्या मनात किती राग आहे ते उघड झाले. सत्ताधारी भाजपाने लोकसभेला आखाडा बनवले आहे. भारतीय जनता पक्ष व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या मनात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड राग आहे,"

भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कधीच आदर नव्हता आणि आजही नाही. महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती असून त्याच विकृतीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधान निर्मात्यांचा घोर अपमान केला आहे. दलित, आदिवासी, मागासवर्गीय समाजाबद्दल भारतीय जनता पक्षाची मानसिकता अत्यंत द्वेषाची आहे.

भाजपा शासित राज्यात मागासवर्गीय समाजावर अनन्वीत अत्याचार होत आहेत. तरीही पंतप्रधान मूग गिळून गप्प कसे काय आहेत? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शाहांची मंत्रिमंडळातून पंतप्रधानांनी तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत, असे रजनी पाटील म्हणाल्या.

पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदशे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, देवीदास भन्साळी, नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, कैलास गायकवाड, गोपाळ तिवारी, राज अंबिके, प्राची दुधाने, अर्चना शहा,वाल्मिक जगताप आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT