Pune News : पुण्यातील वाघोली परिसरात रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात अमरावतीवरून कामाच्या शोधात आलेल्या मजुरांना डंपरने चिरडलं. डंपर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि पदपथावर झोपलेल्या 9 जणांना त्याने चिरडले. यात 3 चिमुरड्यांचा जागीच मृत्यू झाला.
डंपर चालक मध्यधुंद अवस्थेत होता अशी प्राथमिक माहिती आहे. डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
रविवारी रात्री सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात वाघोलीतील केसनंद फाटा येथे घडली. वैभवी रितेश पवार (वय १ वर्ष), वैभव रितेश पवार (वय २ वर्ष), रीनेश नितेश पवार (वय ३) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबत रोहित पवार यांनी सोशल मीडिया वर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार म्हणाले, "तुम्ही गरीब असाल, तुमच्या डोक्यावर छत नसेल आणि धरती हे अंथरूण तर आकाश हेच पांघरूण असेल तर तुम्ही किड्या मुंग्यासारखे चिरडून मेलात तरीही त्याचं कुणालाच काहीच देणंघेणं नाही. असं वाटण्याची परिस्थिती म्हणजे वाघोली केसनंद इथं पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावतीहून आलेल्या आणि दमून भागून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगारांना काळ बनून आलेल्या मद्यधुंद डंपर चालकाने अक्षरशः चिरडलं. यात दोन चिमुकल्यांसह तिघांनी उपाशीपोटीच जगाचा निरोप घेतला तर अजूनही सहाजणांची मृत्यूशी झुंज सुरुय..अंगावर काटा आणणाऱ्या या घटना का थांबत नाहीत? की गरिबांना जगण्याचा अधिकारच नाही का?
सकाळी सकाळी ही बातमी पाहून मन सुन्न झालं. ज्या रोजगारासाठी हे कामगार पुण्यात आले होते तो रोजगार त्यांना अमरावतीतच उपलब्ध झाला असता तर कदाचित आजची ही दुर्घटना घडली नसती. मायबाप सरकार याची दखल घेणार की नाही? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी झालेले कामगार लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना!सरकारने पिडीत कुटुंबांना योग्य भरपाई द्यावी अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे.
1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
2. रिनिशा विनोद पवार 18
3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
5. दर्शन संजय वैराळ, वय 18
6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे
(Edited by: Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.