Congress sarkarnama
पुणे

Congress Politics : काँग्रेसचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा ठरला? कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत केली घोषणाबाजी

Congress Nana Patole MVA : पर्वती विधानसभा मतदारसंघाची मागणी काँग्रेस करणार असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने देखील या जागेसाठी जोर लावला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली होती. मात्र, काँग्रेस आणि शरद पवार यांनी निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा ठरवू, असे म्हणत ठाकरेंची मागणी अमान्य केली. मात्र, काँग्रेसचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा ठरला की काय? असे चित्र पुण्यात पाहायला मिळाले.

आज (बुधवार) काँग्रेस कडून पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील मतदार संघाचा आढावा घेण्यात आला. बैठकीच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वागत करत 'हमारा नेता कैसा हो नाना पटोले जैसा हो' 'भावी मुख्यमंत्री नाना पटोले' अशी घोषणाबाजी केली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र विभाग जिल्हानिहाय बैठकीच्या निमित्ताने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या राज्यातील नेत्यांसमोर नाना पटोले यांना खांद्यावर घेत 'महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री ' म्हणून घोषणा दिल्या. त्यामुळे आगामी काळात नाना पटोले हे देखील महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होऊ शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

या सर्व घोषणाबाजीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल आणि त्यांचे कार्यकर्ते अग्रभागी होते. नाना पटोले यांच्या भावी मुख्यमंत्र्याच्या घोषणे बरोबरच बागुल यांच्या कार्यकर्त्यांनी 'कामगिरी दमदार,आता आबा बागुल आमदार 'अशा घोषणा देऊन पर्वती विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या अशी मागणी केली.

यातून एक प्रकारे आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा निवडणुकीचे तिकीट आपल्याला मिळावे, यासाठी नाना पटोले यांच्याकडे साखर पेरणी केली असल्याचे बोलले जात आहे.

पर्वती मतदारसंघ काँग्रेसकडे?

बैठकीमध्ये देखील नाना पटोले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघाची आपण मागणी करणार असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने देखील या जागेसाठी जोर लावला आहे. त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडी मधील जागा वाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT