Sandeep Dhurve Gautami Patil
Sandeep Dhurve Gautami Patilsarkarnama

Video Sandeep Dhurve : गौतमी पाटील सोबत का नाचलो? आमदाराने केला खुलासा

MLa Sandeep Dhurve dance with Gautami Patil : आमदार संदीप धुर्वे यांचा गौतमी पाटील यांच्यासोबत डान्स करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आमदार धुर्वे यांच्यावर टीका होत आहे.
Published on

Sandeep Dhurve News: उमरखेडमध्ये भयावह पूरपरिस्थिती आहे. पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. या परिस्थितीमध्ये उमरखेडमध्ये भाजप नेत्यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते.

या उत्सवात नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या सोबत आर्णी-केळापूर मतदारसंघातील भाजप आमदार डाॅ. संदीप धुर्वे नाचत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला .या व्हिडिओनंतर आमदार धुर्वे यांच्या टीका करण्यात येत आहे.

आपल्यावर होणार्‍या टीकेला उत्तर देण्यासाठी आमदार धुर्वे समोर आले. त्यांनी आपण गौतमी पाटील हिच्यासोबत डान्स का केला? याचे उत्तर दिले आहे.

आमदार धुर्वे म्हणाले, 'टीका करणं हे विरोधकांचं कामच आहे. काल दहीहंडीचा उत्सव होता. जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आग्रह होता ठेका धरा. त्यांच्या आग्रहा खातर मी ठेका धरला. गौतमी पाटील या खूप फेमस आहेत. त्या कुणासोबत नाचत नाहीत. मात्र, त्या माझ्यासोबत नाचल्या. त्यामुळे दहीहंडीसाठी जे लोक आले होते त्यांना खुशी भेटली.'

Sandeep Dhurve Gautami Patil
Chitra Wagh Vs Anil Deshmukh : '...हा तर आता महाराष्ट्रात पायंडाच पडला आहे' ; चित्रा वाघ यांचं अनिल देशमुखांना प्रत्त्युत्तर!

शेतकऱ्यांच्या नुकसान झाले असताना आमदार नाचत असल्याच्या होणाऱ्या टीकेला देखील आमदार धुर्वे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, मीच तोच आमदार आहे ज्याने शेतकऱ्यांच्या पीकविमा सुटला होता तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख 98 हजार शेतकऱ्यांना 45 कोटीचा विमा मिळवून दिला. सोयाबीन कापूसासाठी ईपीक पाहणीसाठी जी जाचक अट होती ती रद्द केली. शेतकऱ्यांचे हित मी नेहमीच पाहतो.

नुकसानाच्या सर्व्हेचे आदेश

मीच पहिला आमदार आहे ज्याने मुसळधार पावसात तीन तहसीलदारांना आदेश दिले. तत्काळ कृषी साहायक, तलाठी, ग्रामसेवक यांना सर्व्हेचा आदेश द्या, असे आमदार संदीप धुर्वे म्हणाले. तसेच विरोधकांचे कामच आहे टीक करणे, असे म्हणत विरोधकांना टोला लगावला.

Sandeep Dhurve Gautami Patil
Shrikant Shinde News : खासदार श्रीकांत शिंदेंनी न राहून ठाकरेंना चिमटा काढलाच; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com