Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. याच्याच तयारीचा भाग म्हणून हायकमांडच्या स्तरावर राजधानी दिल्लीमध्ये बैठकांचे सत्र सुरूच आहे. त्याचबरोबर राज्यपातळीवरदेखील बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. यातील एक महत्त्वपूर्ण बैठक 23 जानेवारीला पुण्यात होणार आहे. (Latest Marathi News)
आगामी लोकसभा निवडणुकांच्याअनुषंगाने विभागीय चाचणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागातील सर्व जिल्हा कमिट्यांचे बैठक लवकरच पार पडणार आहे. 23 जानेवारी रोजी पुण्यातील काँग्रेस भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरचे नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. त्याचबरोबर या बैठकीला काँग्रेसचे बडे नेते ज्यामध्ये सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, अनंत थोपटे, प्रणिती शिंदे हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत प्रामुख्याने उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरातील निर्णयांची चर्चा करण्यात येणार आहे. तसेच कमिटी, बूथ कमिटी, पातळीवर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कशाप्रकारे तयारी करण्यात येईल, यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच, या बैठकीमध्ये महाविकास आघाडीमधील जागावाटपाच्या फॉर्मुल्याबद्दलदेखील चर्चा होऊ शकते.
काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी याबाबतचे पत्रक काढून मंगळवारी (ता. ९) ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदत दिली होती. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांना संपूर्ण माहितीसह आपले अर्ज मंगळवारपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत सादर करावे लागणार आहेत.
शिंदे यांनी पत्रकामध्ये नमूद केले होते. त्यानंतर तब्बल वीस जणांनी काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये आजी-माजी आमदार आजी-माजी शहराध्यक्ष यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.