Pune : जागेच्या वादातून विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या काँग्रेसचे माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांच्या बचावासाठी अख्खी काँग्रेस सरसावली आहे. या प्रकरणात खोलवर जाऊन दूध का दूध और पानी का पानी करण्याच्या उद्देशाने पुरावे गोळा करून काँग्रेस नेते माध्यमांसमोर येणर आहेत. या घटनेत पुण्यातील आमदाराच्या जवळचा हात असल्याचे काँग्रेस नेते दाखवून देणार आहे. त्यासाठी शिवरकरांना बळ देण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी पुढाकार घेतला आहे.
हे प्रकरण खोटे आहे, त्यात शिवरकरांना कसे गोवले गेले, त्यामागे कोणाचा हात आहे हे सिद्ध व्हावे, यासाठी अरविंद शिंदेंनी(Arvind Shinde) ढीगभर पुरावे जमवले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्येच बॉम्ब फुटण्याची भीती असून, त्यात कोणाचा हात भाजणार हे उद्या स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांचे चिरंजीव अभिजित बाळासाहेब शिवरकर(Abhijit Shivarkar) सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. जागेवरील कुंपण आणि हद्दीच्या वादातून जमीन मालक महिलेला धमकावून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी माजी नगरसेवक राहिलेल्या अभिजित शिवरकरांसह १० जणांवर वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन परिसरात फिर्यादी महिलेची वडिलोपार्जित जागा आहे. या जागेवर संबंधित महिलेच्या कुटुंबाने कुंपण घातले. याच वादातून जागा मालक महिलेला धमकावून तिचा विनयभंग केल्याची तक्रार फिर्यादीत नमूद केली आहे. अभिजित शिवरकर, भास्कर रत्नाकर गायकवाड, त्यांची पत्नी, मुलगा, राजेश खैरालिया, किरण छेत्री (रा. वानवडी गाव) यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरविंद शिंदेंचा पुढाकार...
आता या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच हे प्रकरण म्हणजे शिवरकरांविरोधात रचलेले षडयंत्र असल्याचा दावा करत त्यांनी महत्त्वाचे पुरावेही पोलिसांना दिल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या प्रकरणात दूध का दूध और पानी का पानी करण्यासाठी वेगाने तपास करण्याची मागणी केली आहे. (Congress Political News)
काय आहे प्रकरण...?
वानवडी परिसरातील फिर्यादी महिलेच्या जागेची भूमापन अधिकाऱ्यांकडून सरकारी मोजणी केली होती. मोजणीनंतर त्या ठिकाणी कुंपण घालण्याचे काम सुरू होते. त्यावेळी शिवरकर यांनी कुंपण घालत असलेल्या कामगारांना रोखले व खांब काढून टाकले.' आम्ही जमीन मालक आहोत,' असे म्हणत शिवरकर आणि गायकवाड यांनी महिलेला शिवीगाळ केली. तसेच त्यांनी महिलेला तेथून हाकलून लावले. 'पुन्हा या परिसरात दिसल्यास जिवे मारू, अशी धमकी व त्यांचा विनयभंग केला,' असा आरोप करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यावर शिवरकर काय म्हणाले?
माजी नगरसेवक असलेले अभिजित शिवरकरांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, खोटे आरोप करून माझ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार महिला कोण आहे हेदेखील मला माहिती नाही. चौकशीबाबत मला पोलिसांनी नोटीस दिली. चौकशीला माझे संपूर्ण सहकार्य राहील. मात्र, तक्रारदार यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणताही प्रकार मी केलेला नसल्याचे माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी सांगितले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.