Pune Congress On Kasba By Election : राज्यात सध्या पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा आहे. कसबा पेठ विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी सर्वच पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे.
भाजपमध्ये तर पाच नावे प्रदेशस्तरावर कळविण्यात आले असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. त्यानंतर आता काँग्रेसही तयारीला लागली असून कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून तब्बल १६ उमेदवार इच्छुक असल्याचे समोर आले आहे.
कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून १६ इच्छुक उमेदवारांच्या आज ऑनलाईन पद्धतीने मुलाखती झाल्या आहेत. या मुलाखती काँग्रेसचे निरीक्षक संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी ऑनलाईन पद्धतीने घेतल्या आहेत.
या मुलाखतीनंतर काँग्रेसकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी 16 जणांची नावे प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर या नावाची छाननी केल्यानंतर दिल्लीतून काँग्रेसचा उमेदवार घोषीत होणार आहे.
त्यामुळे काँग्रेसचा (Congress) कसब्यासाठी उमेदवार कोण असणार? तसेच काँग्रेसकडूनच एका पोटनिवडणुकीसाठी तब्बल 16 जण इच्छुक असल्यामुळे आता काँग्रेसकडून नेमकी कुणाला संधी मिळणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.