Kasba by-election News : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. कसबा मतदारसंघासाठी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वत: पुण्यात तळ ठोकला आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघावर अनेक वर्ष भाजपचे वर्चस्व आहे. मात्र, तरीही पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसला संधी मिळाली होती. १९९१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला येथे संधी मिळाली होती. काँग्रेसच्या (Congress) वसंत थोरात यांनी भाजपचे गिरीष बापट यांचा पराभव केला होता. त्यामुळे आता या इतिहासाची पुनरावृत्ती करायचीच, असा चंगच काँग्रेसने बांधला असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यासाठ
याचसाठी पटोले पुण्यात आहेत. त्यांनी सर्व इच्छुक उमेदवारांशी चर्चा केल्याची माहिती आहे. कोणालाही उमेदवारी मिळाली तरी सगळ्यांनी एकजुटीने निवडणूक लढायची, असे पटोले यांनी सांगितले.
कसबा विधानसभा मतदारसंघ अनेक वर्ष भाजपच्या (BJP) ताब्यात आहे. गिरीष बापट येथून पाच वेळा भाजपचे आमदार होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते पुण्याचे खासदार झाले. त्यामुळे येथे भाजपचे मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांना संधी मिळाली होती. मात्र, बापट यांच्या आधी आण्णा जोशी व त्यांच्याआधी अरविंद लेले यांनी येथून निवडणूक जिंकली होती. मात्र, अण्णा जोशी हे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पोटनिवडणूक झाली होती. त्यामध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता.
पोटनिवडणुकीत काँग्रेसने माजी महापौर थोरात यांना संधी दिली होती. तर भाजपने बापट यांना संधी दिली. त्यामध्ये थोरात यांनी बाजी मारली होती. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार का, अशी चर्चा सुरु आहे. भाजपने रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे काँग्रेसनेही जोरदार तयारी केली आहे. त्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेची साथ मिळाल्यास निवडणुकीत रंगत येवू शकते.
मागील विधानसभा निवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना ७५ हजार ४९२ मते मिळाली होती. तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना ४७ हजार २९६ मते मिळाली होती. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची ताकद काँग्रेसला मिळाली तर निवडणूक रंगतदार होऊ शकते, असे राजकीय जाणकार सांगतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.