Balasaheb Thorat News : अखेर बाळासाहेब थोरात भूमिका जाहीर करणार? तांबे, पटोले प्रकरणावर बोलणार

Satyajit Tambe News : अपक्ष आमदार काँग्रेसचे माजी नेते सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Satyajit Tambe  Nana Patole, Balasaheb Thorat News
Satyajit Tambe Nana Patole, Balasaheb Thorat NewsSarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Thorat News : अपक्ष आमदार काँग्रेसचे माजी नेते सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तांबे कुटुंब तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना बदनाम करण्यासाठी कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप तांबे यांनी केला.

या सर्व प्रकरणावर आता बाळासाहेब थोरात भूमिका मांडणार असल्याचे समजते. बाळासाहेब थोरात आज आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. थोरात आज संध्याकाळी संगमनेर मधील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होणार असल्याचे सांगितेल जात आहे. यावेळी थोरात आपली भूमिका जाहीर करण्याची करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. तांबे आणि पटोले वादात बाळासाहेब थोरात काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Satyajit Tambe  Nana Patole, Balasaheb Thorat News
Satyajit Tambe News : सत्यजीत तांबेंचे पटोलेंवर आरोप; 'थोरातांनी आता बोललं पाहिजे : 'काय घडले हे फक्त...'

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. ''सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांना पक्ष सोडायचा असेल तर ते काँग्रेसवर टीका करणारच. पटोलेंवर जे आरोप झाले, त्याला ते (नाना पटोले) उत्तर देतील. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत बोलले पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणाले. तसेच यामध्ये नेमके काय घडले? हे फक्त थोरातच सांगू शकतात. असे मला वाटते. त्यामुळे सत्यजीत तांबे ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, ते पाहता त्यांचा काँग्रेसमध्ये परण्याचा हेतू आहे, असे मला वाटत नाही, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Satyajit Tambe  Nana Patole, Balasaheb Thorat News
मुख्यमंत्री शिंदेंचे 'ओएसडी' डॉ. राहुल गेठे अपघातात जखमी आजी-आजोबांच्या मदतीला धावले; हॉस्पिटललाही नेले...

कसबा, चिंचवड या पोटनिवडणुकीवरही यावेळी भुजबळ यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता, असे भुजबळ म्हणाले. मात्र, आमचे नेते एकत्र बसतील व मग ही निवडणूक बिनविरोध करायची की नाही ते ठरवतील. आमचे नेते यावर निर्णय घेतील. लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com