Mohan Joshi On Eknath Shinde Sarkarnama
पुणे

Congress Vs Mahayuti Government : काँग्रेसने महायुती सरकारवर आरोप करत मुख्यमंत्र्यांना मागितला 'हा' हिशोब!

Mohan Joshi On Eknath Shinde : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी राज्यपाल मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीचे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना सादर केले निवेदन

Sudesh Mitkar

Congress State Vice President Mohan Joshi News : 'राज्याची आर्थिक पिछेहाट करणाऱ्या महायुती सरकारने जनतेच्या हिताचे प्रकल्प राबविण्या ऐवजी टेंडर घ्या, कमिशन द्या, असा कार्यक्रम राबविला आहे.', असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केला आहे.

तसेच, सरकारची 41 महामंडळे तोट्यात का गेली? याचा हिशोब द्यावा, अशी मागणी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्याकडे केली आणि त्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना गुरुवारी दिले.

'राज्यात एकूण 110 सार्वजनिक उपक्रम, महामंडळे आणि कंपन्या आहेत. यातील 41 महामंडळांचा संचित तोटा 50 हजार कोटींवर गेला आहे. एमएमआरडीए हा नफ्यातील उपक्रम कर्जात बुडाला आहे. महामंडळांना दिलेले पैसे कुठे खर्च होत आहेत? त्यातून काय कामे झाली? याची सखोल चौकशी व्हावी.', असेही निवेदनात म्हटले आहे.

तसेच, 'राज्य सरकारने विधीमंडळासमोर 12 जुलै 2024 रोजी 'कॅग'चा अहवाल मांडला. त्यात सरकारच्या गलथान कारभाराचे आर्थिक बेशिस्तीचे भयाण वास्तव समोर आले आहे. दरडोई उत्पन्नात आघाडीवर असणारा महाराष्ट्र आता सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. कृषी क्षेत्रातही महाराष्ट्राची पिछेहाट झाली असून आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज महाराष्ट्रावर जमा झाले आहे.', असेही काँग्रेसच्या(Congress) निवेदनातून सांगण्यात आले आहे.

'टेंडर घ्या, कमिशन द्या' या महायुती सरकारच्या धोरणानुसार कंत्राटदार मित्रांचे खिसे भरण्यासाठी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले. पण, त्यातून राज्याचे भले होण्यापेक्षा सरकारच्या मित्रांचेच भले झाले.', असे मोहन जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT