Deepak Mankar News : 'शरद पवारांनी मोठी संधी दिली तर...'; अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष मानकरांच्या मनात नेमकं काय?

Pune NCP Ajit Pawar Politics : पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शरद पवारांच्या गोटात सहभागी झाल्यानंतर आता पुणे शहरात देखील अशाच प्रकारचे प्रवेश होऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Ajit Pawar - Deepak Mankar.jpg
Ajit Pawar - Deepak Mankar.jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह तब्बल 28 कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.

पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शरद पवारांच्या गोटात सहभागी झाल्यानंतर आता पुणे शहरात देखील अशाच प्रकारचे प्रवेश होऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पुणे शहराध्यक्ष दीपक मानकरदेखील शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) गड मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर या दोन्ही शहरातील बहुतांश कार्यकर्त्यांनी अजित पवारांसोबत राहणं पसंत केलं. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर बहुतांश नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत.

त्यानंतर आता पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्ष सह 28 अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने हा अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. या प्रवेशानंतर अन्य काही प्रवेश पुणे शहरातून देखील होऊ शकतात अशी चर्चा असतानाच याबाबत शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी खुलासा केला आहे.

Ajit Pawar - Deepak Mankar.jpg
Sharad Pawar Vs Ajit Pawar News : पुण्यात शरद पवारांचा मोठा धमाका; अजितदादांचा 'मोहरा' दीपक मानकर हेही फुटणार ?

दीपक मानकर म्हणाले, पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटामध्ये प्रवेश केला आहे. मात्र, या प्रवेशामागचं कारण देखील जाणून घेणे आवश्यक आहे. अजित गव्हाणे हे काही दिवसांपूर्वी भेटले होते. त्यांच्याशी चर्चा झाली त्यानुसार भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे हे आहे. त्यामुळे या मतदारसंघांमधून महायुती कडून आपल्याला तिकीट मिळणे शक्य होणार नाही यामुळे त्यांनी शरद पवार गटांमध्ये प्रवेश केला आहे.

अजित गव्हाणे यांना निर्णय घेण्यापूर्वी ही विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सल्ला दिला होता. भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये 60 ते 70 हजार मुस्लिम मतदार आहे. महायुतीमुळे ते मतदार डिव्हाइड झाले असून आगामी काळामध्ये ते आमच्या सोबत येतील का नाही याबाबत शशकता आहे. त्यामुळे विधानसभेच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व महेश लांडगे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार गटामध्ये प्रवेश करत असल्याचे गव्हाणे यांनी यापूर्वी सांगितले असल्याचा खुलास मानकर यांनी केला.

Ajit Pawar - Deepak Mankar.jpg
Congress News : लोकसभेनंतर काँग्रेसचा कॉन्फिडन्स वाढला, विधानसभेसाठी 'मास्टरप्लॅन' तयार; मुंबईत मॅरेथॉन बैठक

दीपक मानकर यांनी आपण अजितदादांसोबत प्रामाणिक असून इतर कोणत्याही पक्षात जाण्यास इच्छुक नाही असं ठणकावून सांगितले आहे. ते म्हणाले, राजकीय निर्णयाबाबत आम्हाला देखील विचारणा होतात. मात्र, दादांनी मला काही दिलं नाही, तरी शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहणार आहे. पुण्यामध्ये आमची पक्षसंघटना मजबूत असून पंधराशे ते सोळाशे पदाधिकारी सक्रिय काम करत आहे. यातील कोणताही पदाधिकारी पक्ष सोडून जाणार नाही. याउलट कराडमधील 14 नगरसेवक माझ्या संपर्कात असून त्यांना दादांसोबत जोडण्याचा प्रयत्न आगामी काळात मी करणार असल्याचं दीपक मानकर यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक आहे. मात्र, ती संधी जरी मला मिळाली नाही किंवा शरद पवार यांनी आपल्याला कितीही मोठी संधी दिली तरी अजित पवार यांची साथ आपण सोडणार नसल्याचं दीपक मानकर म्हणाले आहेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये मी अजित पवार यांच्याकडे संधी मागितली होती. मात्र, ती संधी मला दिली नाही.

गेले 30 ते 40 वर्ष मी राजकीय क्षेत्रात काम करत आहे त्यामुळे मला संधी मिळावी अशी मागणी मी केली होती. मात्र ती संधी मला मिळाली नाही पण त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा नाराज नाही आणि मी अजित पवार यांच्यासोबत मरेपर्यंत राहणार असं दीपक मानकर म्हणाले आहेत.

Ajit Pawar - Deepak Mankar.jpg
Manoj Jarange Patil : शरद पवार सत्तेत आहेत का? जरांगे पाटलांचा फडणवीसांना सवाल, नेमकं प्रकरण काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com