Bhor Gram Panchyat Election
Bhor Gram Panchyat Election Sarkarnama
पुणे

भोरमध्ये काँग्रेसच्या संग्राम थोपटे गटाचा बोलबाला : १३ ग्रामपंचायींत विजय; राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी

विजय जाधव

भोर (जि. पुणे) : भोर (Bhor) तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींपैकी २० ग्रामपंचायतींचा निकाल हाती आली आहे. यामध्ये काँग्रेस (Congress) अर्थात आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) गटाने वर्चस्व राखले आहे. ग्रामपंचायतींपैकी १३ ठिकाणी काँग्रेसचे सरपंच विजयी झाले आहेत, तर पाच ग्रामपंचायती ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) विजय मिळविला आहे. त्यामुळे थोपटे पुन्हा एकदा तालुक्यावर वर्चस्व राखणार असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांकडून ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा करण्यात आलेला आहे. (Congress wins in 13 gram panchayats of Bhor taluka)

भोर तालुक्यात ३० ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २० ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. त्यातील १३ ग्रामपंचायती आणि सरपंचपद काँग्रेस पक्षाकडे आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पाच ठिकाणी बाजी मारली आहे. एकंदरीतच काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा सुरक्षित राखण्याची शक्यता पहिल्या टप्प्यातून दिसून येत आहे.

भोर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विजयी झालेले सरपंचपदाचे उमेदवार

1) कर्णावड- सोनाली राजीवडे

2) वाठार हीमा - सविता खाटपे

3)अंगसुळे - राणी किरवे

4) कारी - सतीश ढेबे

5) ब्राम्हणघर - रंजना धुमाळ

6) पसुरे - प्रवीण विलास धुमाळ

7) शिरवली तर्फे भोर - कोमल अमित झांजले

8) पारवडी - अमोल भाऊसाहेब लिम्हण

9) वागजवाडी - निकिता ज्ञानेश्वर आवांळे

10) करंदी खेबा नवनाथ मधुकर गायकवाड

11)येवली - कल्पना आनंदा खंडाळे

12)कासुर्डी गु - अजय मालुसरे

13) भांबवडे - माधवी किरण सोनवणे

14) हरिश्चंद्री - सुनिता मारुती गाडे

15) कुरुंगवडी - अंजली ननावरे

16) म्हसर बुद्रुक - एकनाथ सदाशिव मसुरकर

17) सांगवी निदान - मंगेश पालवे

18) तेलवडी - आरती किरण धावले

19) करंदी बुद्रुक - अस्मिता गणेश वरखडे

20) वाटर हिंगे - मुरारी दत्तात्रेय भालेराव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT